दिवसाढवळ्या वृद्धेची सोनसाखळी चोरट्यास अटक करण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हरदास नगर येथे 74 वर्षोय वृद्ध महिलेच्या गळ्यातील 16 ग्रामची सोनसाखळी एका चोरट्याने हिसकावून पसार झाल्याची घटना 13 मे ला सायंकाळी 5 दरम्यान घडली असता परिसरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. यासंदर्भात पीडित फिर्यादी महिला शोभा गणवीर रा भंडारा रोड ,वरठी भंडारा ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 392 अनव्ये गुन्हा दाखल करून घटनास्थळाचे खाजगी सीसीटीव्ही फुटेज तपासून तपासाला गती दिले असता या चोरट्याचा अवघ्या 24 तासाच्या आत शोध लावण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून अटक आरोपीचे नाव किशोर सोलंकी वय 25 वर्षे रा गणेश ले आऊट, कामठी असे आहे.या अटक आरोपी कडून चोरीस गेलेली 8 हजार रुपये किमतीचे 16 ग्राम वजनाचे सोनसाखळी हस्तगत करण्यात आले.

ही यशस्वी कारवाही पोलीस उपायुक्त निकेतन कदम सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, पोलीस उपनिरीक्षक गोपिनाथ राखोडे,पोलीस उपनिरीक्षक सागर भंडारी, फैजूर रहमान,अभय मून,मधुकर निखाडे,श्रीकांत भिष्णुरकर,राजकुमार शेंडे,स्नेहदीप पानतावणे,कुश ठाकूर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

VED starts monthly All-Members’ meet, “Progress Pulse”

Wed May 15 , 2024
Nagpur :- In the competent hands of VED President, Rina Sinha, began the all-members’ first meeting on 12th May 2024, after her taking over as President, in order to provide a platform, once a month, to all VED members to come together, connect and network with each other. The meeting was very well attended by old and newly-inducted members alike. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com