नागपूर :- ज्याअर्थी नागपुर महानगरपालिका, नागपूर मंगळवारी झोन क्र. 10 या क्षेत्रीय कार्यालयाच्या नियंत्रणातील मालमत्ता कर विभागाच्या कार्यक्षेत्रातील वार्ड क्र. 62-मोजा बोरगाव, बार्ड क्र. 61- गोरेवाडा, वार्ड क्र. 61-मोजा झिंगाबाई टाकळी, मौजा मानकापुर, वार्ड क्र. 63-मौजा-मेकोसाबाग, गड्डीगोदाम बार्ड क्र. 65-सदर येथील मिळकतीवरील अनेक वर्षापासुन यकीत मालमत्ता कर भरना न करणाऱ्या मिळकतदाराच्या मिळकतीवर दिनांक 18.12.2024 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत वारंट जप्ती कार्यवाही अंतर्गत एकूण 20 मिळकतीवरील 48.54 लक्ष करीता वारंट कार्यवाही कार्यान्वित करण्यात आली.सदर नियमित वारंट जप्ती कारवाईच्या धाकाने संपूर्ण वारंट कारवाई अंतर्गत 13 मिळकत दाराने त्वरीत मालमत्ता कराबा भरणा करून जप्तीची कारवाई टाळली. त्यापासून 27.49 लक्ष रक्कम त्वरीत वसूल करण्यात आली आणि सहा (6) मिळकतदाराने म.न.पा. कराच्चा भरणा करणेस असमर्थता दर्शविल्याने त्या मिळकतीदाराची जंगम स्थावर मालमत्ता रु. 21.05 लक्ष करिता अंदाजे रु.7.00 कोटी बाजार मूल्य रूपयाच्या मालमत्ता यांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या.
जप्त केलेल्या मालमत्ताधारकांनी पुढील 21 दिवसांत मिळकतीवरील मालमत्ता धकबाकी कर न भरणा केल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 च्या परिशीष्ट “ड” प्रकरण 8 कराधान नियम क्र. 466 (1) (2) व कराधान नियम 47 अंतर्गत जप्त केलेल्या मालमत्ता विक्री करून महानगरपालिकाच्या थकबाकी मालमत्ता कराची रक्कम वसुल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशाच प्रकारची वारंट जप्ती कार्यवाही नियमित सुरु राहील, ज्या मिळकतदारांनी थकीत मालमत्ता कर भरणा केलेला नाही त्यांनी त्वरीत थकीत मालमत्ता कर भरणा करुन जप्तीची कारवाई तसेच जाहिर लिलावाव्दारे विक्रो कार्यवाही टाळावी असे आव्हान झोनचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
सदर कार्यवाही झोनचे सहा. आयुक्त अशोक गराटे यांच्या मार्गदर्शनातील झोनचे प्र. अधिक्षक अजय परसतवार, वारंट अधिकारी शशिकांत जांभुळकर, अरुण मेहरुलीया, प्रफुल जामगडे, प्रविण तंत्रपाळे, प्रशांत चौधरी, पंकज लाड, प्रविण भाटी, प्रणय लांजेवार, प्रविण गायधने, महेंद्र जवादे, गौरव वानखेडे,अश्विन सराफ, राजकुमार कनोजिया, गौतम शंभरकर यांनी पार पाडली.