संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-अंतिम मतदार यादी 1 जुलै रोजी होणार प्रसिद्ध
कामठी ता प्र 24 :- आगामी काळात होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीचा कार्यक्रमानुसार 21 जून ला कामठी नगर परिषद ची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली यावर 27 जून 2022 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे तर या हरकती वरील सुनावणी नंतर 1 जुलै ला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.तर कामठी नगर परिषद कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी हवसे नवसे इच्छुक उमेदवारांनी नगर परिषद गाठून आपपल्या मतदार यादी मध्ये नावे समाविष्ट आहेत की नाही हे पाहण्यासाठी इच्छुकांची धाव अजूनही कायम आहे तसेच ही प्रारूप मतदार यादीचा अभ्यास करण्यासाठी प्रति प्रभाग एक हजार रुपये शुल्क भरून प्रारूप मतदार यादी नगर परिषद कडून विकत घेतल्या आहेत तर या प्रारूप मतदार यादीचा अभ्यास करून आजपावेतो जवळपास 10 च्या वर आक्षेपकर्त्यांनी मतदार यादीवर आक्षेप नोंदविला आहे तरीसुद्धा मतदार यादीची पाहणी तसेच मतदार यादीवर आक्षेप घालणाऱ्यांची धावपळ अजूनही कायम आहे त्यामुळे आता या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तर कामठी नगर परिषद निवडणुकीला आतापासूनच गती मिळत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
निवडणुकीचा एक भाग अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होताच तडकाफडकी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहिर करून राज्य निवडणुक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केल्याने निवडणुकीच्या कामाला गती आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पावसाळ्यात निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता दरम्यान निवडणुकीचा टप्पा म्हणून मतदार यादी अंतिम करणे ,ती जाहीर करण्याची तारीख ही निश्चित झाल्याने आता निवडणुका केव्हाही लागू शकतील असा विश्वास व्यक्त करीत आजी माजीसह नवीनच इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलताना दिसत आहे.