आता जेवढे वापरणार पाणी, तेवढेच येणार बील,नळजोडणीवर लागले मीटर

– पाण्याचा अपव्यय टाळण्यास मनपाचे पाऊल

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन १ जानेवारी २०२४ पासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु होणार आहे. यापुढे पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येणार असल्याने अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण येणार आहे.

चंद्रपूर शहरास ईरई नदी व धरणावरून पाण्याची उचल करून,रामनगर व तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून १६ जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची गरज पाहता सध्या ४५ दशलक्ष लिटर पाण्याचे वाटप मनपाद्वारे दररोज करण्यात येते. आतापर्यंत नळ जोडणी धारकांकडुन वार्षिक पाणीपट्टी कर घेतला जात होता आणि तो सर्वांना सारखाच लागू होता.त्यामुळे पाण्याचा किती वापर प्रत्येकाकडून केला जातो याचा अंदाज बांधणे कठीण होते. आता मीटर सुरु झाल्याने आवश्यक तेवढेच पाणी वापरले जाऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत होणार आहे. 

अमृत योजना सुरु होण्यापुर्वी शहरात ३५ हजार अधिकृत नळ कनेक्शन होते, अमृत योजनेअंतर्गत त्यात वाढ होऊन ६० हजार पर्यंत नळ कनेक्शन देण्यात आलेले आहेत.परंतु त्या नळांना पाणी येत नसल्याची, कमी येत असल्याची किंवा पाण्याचे प्रेशर कमी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. तपासणी केली असता आढळुन आले कि अनेक ठिकाणी उगीच नळ सुरु ठेवणे, वाहने धुण्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणे अश्या निष्काळजीपणाने पाणी पुरवठ्यावर परिणाम होत होता.सर्वांना आवश्यक ते पाणी मिळावे यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक होते त्यामुळे मनपाद्वारे मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आता जेवढे पाणी वापराल तेवढेच देयक द्यावे लागणार आहे.

सदर मीटरचा वापर १ जानेवारी २०२४ सुरु होणार असुन त्रैमासिक ( ३ महिन्यांचे ) बील दिले जाणार आहे. बील प्राप्त होताच १५ दिवसात बील भरणाऱ्यांना १५ टक्के त्यानंतरच्या १५ दिवसात बील भरणाऱ्या नळ जोडणी धारकांना ५ टक्के सवलत दिली जाणार आहे तर थकबाकी असल्यास २ टक्के व्याज लावले जाणार आहे.

पाणी ही एक जीवनावश्यक बाब आहे, त्यामुळे ते वापरावे लागणारच आहे. मात्र जितके काटकसरीने आपण ते वापरू तितके ते जास्त दिवस पुरणार आहे. सदर जलमापक ( मीटर ) बसविल्याने पाण्याचा किती वापर करावा याचा अंदाज येईल व ज्याप्रमाणे आपण पैशासाठी मासिक अंदाजपत्रक तयार करतो त्याचप्रमाणे पाण्यासाठी सुध्दा अंदाज पत्रक तयार केले तर कोणत्या वापरात आपण पाण्याची बचत करू शकतो याची कल्पना येवू शकेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामगार नगर च्या सौरभ रंगारी ची भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड

Sat Dec 23 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नेपाळ टेनिस बॉल क्रिकेट महासंघाच्या विद्यमाने तसेच ऐशीयन टेनिस बॉल क्रिकेट महासंघाच्या मार्गदर्शनार्थ नेपाळ येथील पोखरा मध्ये 30 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 पर्यंत एशिया कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा(पुरुष-महिला) चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत भारत, भूतान, श्रीलंका, बांगलादेश,व नेपाळ चे महिला पुरुष संघ सहभाग घेत असून नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातील कामगार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com