संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजने नंतर लाडका भाऊ योजना लागू केली.या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय, आपले सेवा केंद्र आदी ठिकाणी एकच गर्दी केली आहे.ही योजना महिलासाठी अत्यंत फायद्याची असून अभिमानास्पद आहे.लागू झालेल्या योजनेमुळे मुख्यमंत्री च्या लाडक्या बहिणीचे, लाडक्या भावांचे गेम चांगलाच जमला पण लाडक्या जवाईबापूचे काय?असा प्रश्न लाडके जावई बापूच्या वतीने कामठी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान उपस्थित करीत आहेत.
या योजने अंतर्गत शासनाला व सेतू सुविधा केंद्रांना मोठा महसूल प्राप्त होत आहे. सध्या शेतीचा खरीप हंगाम सुरू झाला असून शेतीची कामे सुरू आहेत मात्र शेतकरी शेतमजुर महिला शेतीची आणि घरची कामे सोडून योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले आधार केंद्र,सेतू केंद्रावर रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे.पंधराशे रूपयाच्या लोभापाई अनेक महिलांची मजुरी बुडत आहे.त्यातच सर्व्हर डाऊन झाल्याने कधी कधी नेटवर्क मिळत नसल्याने महिलांना दररोज सेतू केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहे.त्यामुळे नेटवर्क व साईट बंद पडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.अन्यथा 31 ऑगस्ट पर्यंत सुद्धा या योजनेचे प्रोसिजर पूर्ण होणे कठीण आहे.मात्र या फुकटच्या योजनांमुळे केंद्र व महाराष्ट्र शासन नागरिकांना निष्क्रिय व आळशी बनवत असल्याच्या प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.शासनातर्फे आरोग्य सेवेसाठी पाच लाख रुपये फुकट, रेशन फुकट आणि आता ,तेल मीठासाठी पंधराशे रुपये फुकट, या सर्व फुकटच्या योजनामुळे शेतमजूर व सामान्य माणूस आळशी आणि निष्क्रिय होणार असून याचा सर्व वाईट परिणाम शेतकरी व शेती व्यवसायावर होणार असल्याचे मत कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान यांनी व्यक्त केले.