कुख्यात गुंड हद्दपार

नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत रॉय गॅलक्सी अपार्टमेंट नं. २०४ बाबा सुदानी नगर येथे राहणारा कुख्यात गुंड नामे प्रितसिंग उर्फ अनमोलसिंग हरमितसिंग सलुजा वय २१ वर्षे याचे विरुध्द पो ठाणे पाचपावली हद्दीत येथे घातक शस्त्र बाळगणे, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, शस्त्रानिशी चोरी करणे, दरोडयाची तयारी, शिवीगाळी, जिवे मारण्याची धमकी, इत्यादी गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या अशा कृत्यामुळे लोकांचे मनात असुरक्षीततेची भावना निर्माण झाल्याने पाचपावली पोलीसानी गुंड ईसमाविरूध्द हरपार प्रस्ताव तयार करून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क्र. ०३. नागपूर शहर यांचेकडे पाठविला. पोलीस उपआयुक्त यांनी त्यास महाराष्ट्र पोलीस कायदा १९५९ प्रमाणे हृददपार आदेश क पोउपमा परी ०३/ पार ४१५५/२०२३, दि. ३०/०६/२०२३ अन्वये ०२ वर्षाकरीता नागपूर शहर व नागपूर ग्रामीण भागातुन हदपार केले आहे. हद्दपार इसमास दि. ०४/०७/२०२३ ला दमोह, जि. चिंदवाडा, मध्यप्रदेश येथे सोडलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींस २४ तासाचे आत अटक

Thu Jul 6 , 2023
नागपूर :- फिर्यादी विशाल हरीदास मेश्राम वय ३४ वर्ष रा. भगवान नगर, प्लॉट न. २० पोलीस ठाणे अजनी हद्दीत, मानेवाडा रिंग रोड, बम्हा बार अँड रेस्टारेंट येथुन दारू घेवून झाल्यानंतर बाहेर आले. बारचे बाहेर आधिपासून उभा असलेल्या अज्ञात आरोपीने त्यांच्या जवळ येवून फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चैन वजनी १५ ग्रॅम किमती ७०,०००/- रु. ची जबरीने हिसकावून पळून गेला. फिर्यादी यांनी पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com