नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ३०/०८/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे गणेशपेठ, तहसील व धंतोली, नागपूर चे हद्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अजय पुनमलाल गौर, वय ३१ वर्ष रा. हंसापुरी चौक, छोटी खदान, पाण्याचे टाकीजवळ पो.स्टे, तहसील, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक ३०/०८/२०२३ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. ३०/०८/२०२३ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. अजय पुनमलाल गौर याचे विरूद्ध पोलीस स्टेशन गणेशपेठ, तहसील व धंतोली येथे प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे, सुर्यास्त व सुर्योदय दरम्यान संशयास्पदरित्या मिळणे. बेकायदेशिर जमावाचा घटक असणे, प्राथघातक शस्त्रानिशी सज्ज होवुन बेकायदेशिर जमावात शामील होणे, दंगा करणे. लोक सेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्यासाठी हमला करणे, लोक सेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे, लोक सेवक सार्वजनिक कार्य पार पाडीत असता त्याला अटकाव करणे, प्राणघातक शत्र जवळ बाळगणे, मनाई व तडीपार आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबध्द इसमास सन २०१४ मध्ये २ वर्षाकरिता नागपूर शहर व नागपूर जिल्हा येथून हृदयार करण्यात आले होते तसेच स्थानबध्द इसमाविरुद्ध सन २०२० मध्ये तहसील पोलीसांकडून कलम १०७, ११६( ३) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. परंतु स्थानबध्द इसमावर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. अलीकडील काळात त्याने पोलीस स्टेशन तहसील व धंतोली हद्दीत बेकायदेशिर जमावाचा घटक असणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होत बेकायदेशिर जमावात शामील होणे, दंगा करणे, लोक सेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून काने परावृत्त करण्यासाठी हमला करणे, लोक सेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे, लोक सेवक सार्वजनिक कार्य पार पाडीत असता त्याला अटकाव करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे अजय पुनमलाल गौर याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेताल एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला, त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समोर सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूद्ध स्थानबध्यतेचा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूद्ध स्थानबध्दतेची महत्वपूर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.