कुख्यात गुंड स्थानबध्द्

नागपुर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २७.०७.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे तहसिल, कोतवाली, सदर व सक्करदरा, नागपूर चे हद्‌दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे फारीस वल्द निजामुददीन कादरी, वय २५ वर्षे, रा. गुलाब बाबा शाळेजवळ, नालसाहब चौक, मोमीनपुरा, पोलीस ठाणे तहसिल, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम सन् १९८१ अंतर्गत दिनांक २७.०७.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दिनांक ०२.०८.२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

फारीस वल्द निजामुददीन कादरी, याचेविरूध्द पोलीस ठाणे तहसिल, कोतवाली, सदर व सक्करदरा येथे आपखुशीने दुखापत करणे, खंडणी मांगणे, खंडणीसाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भिती बालणे, खंडणीसाठी एखादया व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भीती घालण, गृह अतिक्रमण करून जीवे मारण्याची धमकी देणे, अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, अपराधीक जीवे मारण्याची धमकी देणे, आपखुशीने प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, प्राणघातक शस्वासह गैरवर्तण करणे, खंडणीसाठी एखादया व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भीती घालणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्तेविरूध्दचे तसेच शरीराविरूध्दने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबध्द इसमाविरूध्द सन २०२२ मध्ये पोलीस ठाणे सदर पोलीसांकडून कलम ११० (६) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर प्रतिबंधक कारवाईचा त्याचेवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्याने पुन्हा नवीन जोमाने गुन्हे करणे सुरूच ठेवले आहे. अलीकडील काळात त्याने पोलीस ठाणे तहसिल परिसरात सार्वजनीक जागेवर गोंधळ घालुन, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, लोकसेवकास त्यांचे कर्तव्या पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदरीपात्र बल प्रयोग करणे लोकसेवक सार्वजनिक कार्य पार पाडील असता त्याला अटकाव करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे, इत्यादी तसेच स्थानबध्द इसमा विरूध्द लोकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे फारीस वल्द निजामुददीन कादरी, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस वाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे तहसील, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानवध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेया आदेश पारित करून त्यास काल्हापुर मध्यवर्ती कारागृह, कळंबा येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खंडणी मागुन, अवैध सावकारी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Sun Aug 4 , 2024
नागपूर :- फिर्यादी संजय उत्तमराव खांडेकर, वय ५५ वर्ष, रा. फ्लॅट नं. ३०३, वि, विंग व्यकटेश सिटी- २. बेसा, नागपूर यांना आर्थिक अडचण असल्याने त्यांनी सन २०१६ ते जुन २०२४ चे दरम्यान, आरोपी नामे सागर जयेंन्द्रकुमार दोषी, वय ३७ वर्ष, रा. त्रिमुर्ती नगर, नागपूर, यांचे जवळुन पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत बेसा चौक, नागपूर येथे ४ लाख रूपये व्याजाने घेतले होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com