कुख्यात गुंड स्थानबद्ध 

नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १८.०४.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे यशोधरानगर व गिट्टीखदान, नागपूर शहर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे जाबीर शेख वल्द रज्जाक शेख, वय २९ वर्ष, रा. संतोषनगर झोपडपटट्टी, पोलीस ठाणे यशोधरानगर, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक १८.०४.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला होता. परंतु सदर स्थानबध्द इसम हा स्थानबध्द आदेश पारित केल्यापासुन फरार होता. तेव्हापासुन यशोधरानगर पोलीस त्याचा शोध घेत होते. आज दिनांक २८.०७.२०२४ रोजी तो पोलीस ठाणे यशोधरानगर येथील पोलीसांना मोहम्मद रफी चौक येथे दिसुन आल्याने त्यास तात्काळ ताब्यात घेऊन हजर केल्याने दिनांक २८.०७.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश व संबंधीत कागदपत्रे बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

जाबीर शेखा वल्द रज्जाक शेख याचे विरूध्द पोलीस ठाणे यशोधरानगर व गिटट्टीखादान येथे खुन करण्याचा प्रयत्न करणे, प्राणघातक शस्वाने आपखुशीने गंभीर दुखापत करणे, आपखुशीने गंभीर दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शांतता भंग करण्याच्या उददेशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, अपहरण करणे, गृह अतिक्रमण करणे, प्राणघातक शस्व जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्त्ता आणि शरीराविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबध्द इसमाविरूध्द पो. ठाणे पांचपावली पोलीसांकडून सन २०१८, २०२३ मध्ये कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. त्याचेकडुन रू. ४०,०००/- रक्कमेचे ०२ वर्षांकरिता अंतिम बंधपत्र पेण्यात आले होते. प्रस्तावित स्थानबध्द इसमाने सदर बंधपत्राचे उल्लंघन करून अलिकडील काळात त्याने पोलीस ठाणे यशोधरानगर हदट्रीत गृह अतिक्रमण करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, अश्लिल शिवीगाळ करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्राणघातक शख जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लघंन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे जाबीर शेख वल्द रज्जाक शेख याची अपराधीक कृत्ये निरंतर वाहत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस वाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे यशोधरानगर, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरुध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक

Mon Jul 29 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे वाडी हद्दीत, प्लॉट नं. १०, ११, कंट्रोलवाडी, वेलट्रिट हॉस्पीटल मागे, नागपुर येथे फिर्यादी निर्मल राजकुमार मिरानी, वय ४१ वर्षे, रा. प्लॉट नं. २५, चावला चौक, जरीपटका, नागपूर यांचे प्रिती ट्रेडर्स नावाचे ईलेक्ट्रीक सामान विक्रीचे गोडवुन आहे. गोडावुन बंद करून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे गोडावुनचे शटर वाक्युन आत प्रवेश करून ड्राव्हर मधील रोख १,२२,०१०/- […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com