संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पोलीस स्टेशन हद्दीतील टेकाडी येथिल कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार भुजंग महल्ले यास मा.उपविभागिय अधिकारी रामटेक यांचे आदेशा ने नागपुर जिल्हयातुन सहा महिन्याकरिता हद्दापार कऱण्यात आले आहे.
टेकाडी गावात राहणारा कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार भुजंग जनार्धन महल्ले याचे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे उद्देशाने व परिसरातील नागरिकांचे मनात त्याचे विरुद्ध निर्माण झालेले दहश तीचे प्रभाव संपविण्याचे उद्देशाने त्याचे विरुद्ध कन्हान पोलीसांकडुन कलम ५६ (१) (ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये ईस्तगाशा तयार करुन वरिष्ठ पोलीस अधिकारी साहेबा मार्फतीने उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्याकडे पाठविण्यात आले होते. सदर प्रकर णी उपविभागीय अधिकारी रामटेक यांनी सुनावनी अखेर सदर ईसमास नागपुर ग्रामिण जिल्हयातुन ६ महीन्यासाठी हद्दपार केल्याचे आदेश पारित केल्याने सदर ईसमावर आदेश तामिल करून त्यास त्याचे नाते वाईकांकडे तुमसर जिल्हा भंडारा येथे पाठविण्यात आले आहे. सदर कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर यांच्या मार्गदशनात वरिष्ठ पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते, सपोनि चेतनसिंह चौहाण, पो.हवा जमाल मुदस्सर, हरिष सोनभद्रे, पोना अमोल नागरे, अनिल यादव, पो शि अश्विन गजभिये, आकाश सिरसाट, नवीन पाटील यांनी पार पाडली.