नागपूर :- कारागृह उपमहानिरिक्षक नागपुर विभाग यांचे आस्थापनेवरील कारागृह भरती २०२२-२०२३ मधील एकुण २५५ रिक्त पदे भरण्याकरीता दि. ०२.०३.२०२४ अन्वये जाहीरात देण्यात आली होती. त्यांसवधाने पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा ही दि. २९.०९.२०२४ रोजी दुपारी ०३.०० वा. ते ०४.३० वाजता पर्यंत १) पोलीस मुख्यालय, पोलीस लाईन टाकळी, जुना काटोल नाका चौक, नागपुर महीला उमेदवाराकरीता व २) मानकापुर स्टेडीयम (विभागीय किडा संकुल), मानकापुर, कोराडी रोड, नागपुर (पुरूष उमेदवाराकरीता) या दोन ठिकाणी आयोजीत केली आहे.
करीता उमेदवारांनी दिनांक २९.०९.२०२४ रोजी दुपारी ०१.०० वा. उपस्थित रहावे. दुपारी ०२.३० वा. नंतर उशीरा हजर होणाऱ्या उमेदवारांना परिक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
उमेदवारांनी लेखी परिक्षेचावत www.nagpurpolice.gov.in या संकेत स्थळावर व महाआय टी विभागाचे htts://policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असुन, उमेदवारांनी या संकेतस्थळावर पाहुन लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे.
ज्या उमेदवारांचे यादीत नाव आहे परंतु त्यांचे प्रवेश पत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड होत नाही, अशा उमेदवारांनी देखील लेखी परिक्षेकरीता महीला उमेदवारांनी पोलीस मुख्यालय, पोलीस लाईन टाकळी, जुना काटोल नाका चौक, नागपुर व पुरूष उमेदवारांनी विभागीय किडा संकुल) मानकापुर स्टेडीयम, कोराडी रोड, मानकापुर, नागपुर येथे दिनांक २९.०९.२०२४ रोजी दुपारी ०१.०० वा. उपस्थित रहावे. दुपारी ०२.३० वा. नंतर उशीरा हजर होणाऱ्या उमेदवारांना परिक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
उमेद्वारांना लेखी परीक्षेबाबत काही अडी-अडचणी असल्यास कार्यालय पोलीस आयुक्त, नागपुर येथे प्रत्यक्ष येवून संपर्क साधावा.
उमेद्वारांनी परीक्षेकरीता येताना महाआयटी मुंबई यांचेकडील लेखी परीक्षेकरीता प्राप्त होणारे प्रवेशपत्र व मैदानी चाचणीचे वेळी प्रवेश पत्र असे दोन्ही प्रवेशपत्र सोबत आणावे. ओळख पटविणेकरीता आधारकार्ड, लायसन्स, पॅनकार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक मुळ ओळखपत्र आणि ४ पासपोर्ट साईज फोटो आणने अनिवार्य आहे.