अशासकीय व स्वयंसेवी संस्थांनी क्षयरुग्णांचे पालकत्व स्वीकारावे – मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचे आवाहन

– क्षयरोगमुक्त भारत अभियानाची बैठक 

नागपूर :-  राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत येत्या २०२५ पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या अनुषंगाने क्षयरुग्णांना लागणाऱ्या पौष्टिक आहारासाठी अशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांनी क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व स्वीकारत क्षयरोग हद्दपार करण्यास मदत करावी असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात ‘क्षयरोग मुक्त भारत’ अभियानासाठी अशासकीय संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांची बैठक पार पडली. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, संगीता शिंगणे, उत्तम मधुमटके, मैत्री परिवार संस्थेचे संस्थापक प्रकाश रथकंठीवार, व्ही७ फाउंडेशनच्या नेहा पाठनिया, श्री स्वामी नारायण सोसायटीचे हेमंत खंगार यांच्यासह अशासकीय संस्थेचे १२ हून अधिक सदस्य उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना राम जोशी म्हणाले की, नागपूर महानगरपालिका नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करीत आहे. येत्या २०२५ पर्यंत क्षयरोगाला भारतातून हद्दपार करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने येत्या काही वर्षात नागपुरातला क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार महानगरपालिकेने केला आहे. क्षयरुग्णांना उत्तम औषध उपचाराच्या सुविधेसोबतच पोषण आहार मिळाल्यास क्षयरोग बरा होऊ शकतो. यासाठी नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व घ्यावे असे आवाहन राम जोशी यांनी केले. यापूर्वी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्तिगत रित्या एका तरी क्षय रुग्णाचे पालकत्व घ्यावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले असल्याचेही राम जोशी यांनी यावेळी सांगितले.

या मोहिमेचे उद्दिष्टे क्षयरोग दुरीकरणाच्या प्रयत्नांमध्ये व्यक्ति / सामाजिक संस्थांचा सहभाग वाढणे. टीबीवरील लढयासाठी सामाजिक सहाय्य घेणे, क्षयरोगविषयी जनजागृती करणे, क्षयरोगाशी संबंधित समाजातील कलंक / भिती जनजागृती द्वारे कमी करणे. क्षयरुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांचा खर्चाचा भार कमी करणे. उपचाराखालील क्षय रुग्णांना पोषण आहार पुरवठा करणे व त्यांचे उपचाराची फलित सुधारणे आहे, यासाठी गैर सरकारी व सामाजिक संस्था , व्यक्ती , संस्था ( सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही ) उद्योग संघटना , कॉर्पोरेट्स , औद्योगिक स्वयंसेवी संस्था , व्यापारी असोसिएशन आणि व्यक्ति आणि भागीदार यांच्या मदतीद्वारे ” क्षयरोग मुक्त भारत ” उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी शहर क्षयरोग कार्यालयामार्फत यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे या यंत्रणेद्वारे नागपूर शहराअंतर्गत उपचारा खालील क्षयरुग्णांना किमान एक वर्षासाठी अपेक्षित आहे. दत्तक घेवून रुग्णांना पोषण सहाय्य, व्यावसायिक समर्थन, निदानात्मक सहाय्याद्वारे मदत प्रदान करणे या योजनेअंतर्गत ज्यांना वरील स्वरुपात क्षयरुग्णांना स्वईच्छेने काही मदत करावयाची असेल तर सहभाग नोंदवावा. उपरोक्त मोहिमेमध्ये आपण आपल्या कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहायता म्हणुन वरील बाबींसाठी तरी उपरोक्त योजनेमध्ये आपण आपल्या कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहायता म्हणून वरिल बाबीसाठी सहभाग नोंदवावा तसेच https://tbcindia.gov.in या निक्षय पोर्टलवर स्वतःचे / संस्थांचे रजिस्ट्रेशन करावे किंवा शहर क्षयरोग कार्यालय , सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र , रेसीडेन्सी रोड , कॅनरा बँकेसमोर , सदर नागपूर येथे प्रत्यक्ष भेट देवून किंवा dtomhngc@rntcp.org या ई – मेल आयडी द्वारे निक्षय मित्र म्हणुन संपर्क साधू शकता असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोच्चि में त्रि - दिवसीय यूएमआई राष्ट्रीय सम्मलेन प्रारंभ

Sat Nov 5 , 2022
• महामेट्रो स्टाल का केंद्रीय मंत्री पुरी ने किया उद्घाटन नागपुर :- अर्बन मोबिलिटी इंडिया (यूएमआई) के १५ वें सम्मेलन का शुक्रवार को कोच्चि, (केरल) में उद्घाटन केंद्रीय आवास एवं शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी ने किया । केरल के मुख्यमंत्री पिनाराई विजयन मुख्य अतिथि के रूप में ऑनलाइन उपस्थित हुए । राष्ट्रीय सम्मेलन के तहत केंद्रीय मंत्री पुरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!