बालकांच्या नियमित लसीकरणाबाबत समाजात जनजागृती आवश्यक आरोग्य विभागातर्फे लसीकरण सुक्ष्मकृती आराखडा प्रशिक्षण

नागपूर : लस ही अर्भके, मुले आणि गर्भवती महिलांना रोग आणि मृत्यूपासून वाचवण्यासाठी सर्वात प्रभावी, परवडणाऱ्या आणि सुरक्षित पद्धतींपैकी एक आहे. संपूर्ण लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने, नियमित लसीकरणाबाबत समाजात अधिकाधिक जनजागृती पसरविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहीरवार यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत शुक्रवारी (ता.१९) रघुजीराजे भोसले नगर भवन, महाल येथे लसीकरण सुक्ष्मकृती आराखडा प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी आरसीएच अधिकारी डॉ. सरला लाड, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डब्लूएचओ चे सव्ह्रेर्लन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद उपस्थित होते. प्रशिक्षणात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला.

पुढे बोलताना ते म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांनी शहरातील सर्व भागात पोहोचून लसीकरण न झालेल्या गरोदर स्त्रिया आणि मुलांचे लसीकरण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करावे. प्रशिक्षक डब्लूएचओ चे सव्ह्रेर्लन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद यांनी प्रशिक्षणादम्यान, बालकांचे लसीकरण वाढविण्याबाबत तसेच त्याबाबतचा अहवाल कसा तयार करायचा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. समाजात नियमीत लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. जेनेकरून येणारी पिढी निरोगी आणि सुदृढ तयार होईल. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत नियमीत लसीकरण कार्यक्रम पोहचविणे गरजेचे असल्याचे डॉ. साजिद यांनी सांगीतले.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहीरवार यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा समाजाला पुरविण्याबाबत आवाहन केले. बालकांमधील लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येणाऱ्या आजारांचे प्रमाण व त्या आजारांमुळे होणोरे मृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे नियमित लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येणाऱ्या आजारांसाठी लहान बालकांचे लसीकरण, धनुर्वातासाठी गरोदर मातांचे लसीकरण, नियोजित सत्रांमध्ये लसीकरण करणे, लसीची क्षमता टिकवण्यासाठी एडी सिरिंजेसचा योग्य साठा करणे, जैविक वैद्यकिय कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे, लसीकरणानंतर उदभवणाऱ्या विपरित प्रतिक्रियांचा आढावा घेणे इत्यादी सूचना प्रशिक्षणादरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य व एन.यू.एच.एम. समन्वयक सौ. दिपाली नागरे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोविड लसीकरण अमृत महोत्सव

Sat Aug 20 , 2022
 ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत १५ जुलै ते ३० सप्टेंबर (७५ दिवस) या कालावधीत १८ वर्षावरील सर्व नागरीकांना कोविड लशीची वर्धित मात्रा शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत देण्यात येत आहे. देशभरात ‘कोविड लसीकरण अमृत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. कोरोनाचा धोका अद्यापही पुर्णत: टळलेला नसल्याने या विषाणूच्या प्रतिबंधासाठी वर्धित मात्रा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.             राज्यात कोविड लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी २०२१ पासून प्रारंभ झाला. केंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com