जागतिक महिला दिनानिमित्त 10 मार्च ला ‘निर्धार महिला पुरस्कार 2024’प्रदान समारंभ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा होणार सत्कार

– क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मूर्तीस करणार अभिवादन

कामठी :- माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत ‘निर्धार महिला व बालविकास समिती ‘ही सन 1995 पासून सातत्याने महिलांच्या शैक्षणिक ,सामाजिक ,सांस्कृतिक ,वैद्यकिय क्षेत्रात काम करीत आहे. पुरोगामी महिला परिषद, श्रमिक महिला प्रशिक्षण शिबीर ,बालव्यक्तिमत्त्व विकास शिबीर, थोर महापुरुषांच्या जीवन चरित्रावर स्पर्धा परीक्षा इत्यादी उपक्रम राबवित आहे.

नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ‘विदर्भ साहित्य संकुल’झांशी राणी चौक नागपूर येथे निर्धार चे मुख्य कार्यालय असून या कार्यालयातुन महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविण्यात येते तसेच तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचार संदर्भात जनजागृती करून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी निर्धार च्या महिला कार्यकर्त्या नेहमीच तत्पर असतात.दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा ‘निर्धार महिला पुरस्कार’देऊन सन्मानित करण्यात येते त्यानुसार यावर्षीसुद्धा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘निर्धार महिला व बाल विकास समिती तर्फे 10 मार्च ला दुपारी साडे बारा वाजता उत्तर नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘निर्धार महिला पुरस्कार -2024’प्रदान करून सम्माणीत करण्यात येणार आहे तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 127 व्या स्मूर्ती दिनानिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्धार महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षा, माजी राज्यमंत्री व राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या माजी सदस्या ऍड सुलेखा कुंभारे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून तिरपुडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन नागपूर च्या संचालिका वणीता तिरपुडे, महिला विभाग जमाते इस्लामी हिंद नागपूर च्या अध्यक्षा डॉ सबिहा खान,स्त्री व बाल रोग तज्ञ डॉ प्रीती मानमोडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून सुमेधाताई नितीन राऊत,ज्योति चंद्रशेखर बावनकुळे, सरीता मिलिंद माने,स्नेहल दाते,रोशनि सिद्धार्थ गायकवाड राहणार आहेत.

तसेच या कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून वंदना अरविंद राऊत(सामाजिक क्षेत्र),बबिता सतीश भैसारे(सामाजिक), प्रतिष्ठा महिला बचत गटाच्या अध्यक्षा रंजिता विनोद दहिवले (सामाजिक क्षेत्र),माजी महापौर माया इवनाते(राजकीय)रुबिना अजमत अन्सारी(शैक्षणिक),डॉ सविता कांबळे,(साहित्यिक क्षेत्र),भंडारा पोलीस उपअधीक्षिका रश्मीता राव,(प्रशासन क्षेत्र),कु.पूर्वाक्षी मनोज तातोडे ,एम एफ ए आर्ट महाविद्यालय (कला क्षेत्र)कु साक्षी बांबोर्डे,राष्ट्रीय कबड्डी पटू(क्रीडा क्षेत्र), नीलिमा बावणे(संचालिका ,धरमपेठ महिला बँक, नागपूर),(उद्योग क्षेत्र),युसीएन टीव्ही चॅनल च्या न्यूज रिपोर्टर सरिता राजन(पत्रकारिता क्षेत्र),आयुर्वेदिक तज्ञ डॉ प्रज्ञा मेश्राम (वैद्यकिय क्षेत्र),आदी महिलांचा ‘निर्धार महिला पुरस्कार’देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मोफत रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sat Mar 9 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्शासन आरोग्य सेवा यांच्या नेतृत्वाखाली कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आयुष्यमान भव:अभियान तथा ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे ‘अंतर्गत आयोजित मोफत रोग निदान शिबीर व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या शिबिरात अंतर्गत एकूण 985 लाभार्थ्यांचे मोफत वैद्यकिय तपासणी करण्यात आले त्यातील 18 वर्षावरील 172 लाभार्थ्यावर तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!