निर्भया निधीतील वाहने आमदारांच्या सरंक्षणासाठी ; शिंदे टोळीतील आमदारांना नक्की कशाची भीती वाटते ?,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कडाडले…

निर्भया निधीतील वाहने पोलीस स्टेशन्सला तात्काळ पाठविण्यात यावीत…

मुंबई  :- निर्भया निधी महिलांची सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला निधी होता. मात्र या निधीतून घेतल्या गेलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे त्यामुळे ही वाहने तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

एकीकडे मुख्यमंत्री जनता त्यांच्या सोबत असल्याचा दावा करतात, दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक समर्थक आमदार व खासदाराला पाच पोलिसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतात. जनता त्यांच्यासोबत असेल तर मग त्यांना नक्की भीती कशाची वाटते आहे? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान निर्भया निधीतून घेतलेली वाहने ही पोलीस स्टेशन्सला त्वरित पाठविण्यात यावीत. आमदारांच्या सुरक्षिततेपेक्षा राज्यातील जनता व महिला भगिनींची सुरक्षा आम्हाला जास्त महत्वाची वाटते असेही जयंत पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PM flags off Vande Bharat Express from Nagpur Railway Station

Sun Dec 11 , 2022
Nagpur :-The Prime Minister, Narendra Modi flagged off Vande Bharat Express connecting Nagpur and Bilaspur from platform number 1 of the Nagpur Railway Station today. The Prime Minister inspected the train coaches of the Vande Bharat Express and took stock of the onboard facilities.  Modi inspected the control centre of the locomotive engine of Vande Bharat Express and also took […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!