गोदिया :- पाश्चात्य जीवन पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृती व दैनंदिन जीवनासोबतच अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पध्दतीवरही पडला आहे. वाढदिवसाला औक्षण करण्याची पध्दत बदलून त्याची जागा केक कापणे आणि मेणबत्ती फुंकणे यांसारख्या पाश्चात्य पध्दतीनी घेतली आहे. मात्र या परंपरेला बगल देऊन सामाजिक जाणिवेतून वाढदिवस साजरा करावे असे प्रतिपादन गोंदिया शिक्षण संस्थेचे संचालक निखिल राजेद्र जैन यांनी केले.
न्यु.जी.ई.एस. फोरम, गोंदिया शिक्षण संस्था तसेच एन.एम. डी. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सहयोग हॉस्पिटलच्या सहकार्याने गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेद्र जैन यांच्या मार्गदर्शनात नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी निखिल जैन बोलत होते. महाविद्यालयात आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन निखिल जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन, सहयोग हॉस्पीटल गोंदियाचे हृदय रोग तज्ञ डॉक्टर अजय कन्नावार, नेत्र चिकित्सक डॉ. पुष्पराज नरखेडे, सामान्य चिकित्सक डॉ. आदित्य महाजन, डॉ. सुमित पीसे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. नेहा कडू उपस्थित होते.
राजेद्र जैन यांनी आरोग्य तपासणी शिबीराला भेट दिली. एनएमडी महाविद्यालय राबवित असलेल्या कार्याची प्रशंसा करून आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालक निखिल जैन व प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी सुद्धा शिबीरात आरोग्य तपासणी करून उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहण दिले.
या प्रसंगी उपस्थित तज्ञ वैद्यकीय अधिका-यांनी उपस्थितांच्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करून मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम सभागृहात विद्यार्थ्यांनी गीत गायन करून वर्षा पटेल यांचा जन्मदिवस उत्साहपूर्वक साजरा केला.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी तरंग मुलतानी व लावण्या फुंडे यांनी तर आभार डॉ. किशोर वासनिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विभीन्न विभागातील विभाग प्रमुख व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.