नवउद्योजकांना एकाच छताखाली मिळणार स्टार्टअप एक्सपोमध्ये विविध माहिती – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

– नागपूर येथे होणा-या नमो महारोजगार मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे’आयोजन

मुंबई :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागार्तर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या ‘नमो महारोजगार मेळाव्यात, स्टार्टअप एक्सपोचे आयोजन ९ आणि १० डिसेंबरला करण्यात येत आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत या एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून या एक्सपोत स्टार्टअप्स, इनवेस्टर्स आणि इनकुबेटर्ससह इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मंत्री लोढा म्हणाले की, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने स्टार्टअप म्हणजे काय ते यशस्वी उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शनसुद्धा करण्यात येणार आहे. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे स्टॉल्सही उभारण्यात येणार आहेत.स्टार्टअप सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा, इनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांच निरसणही केले जाणार आहे. या एक्सपोमध्ये स्टार्टअप्ससाठी इनक्यूबेटर, गुंतवणूकदार, ग्राहक, शासनासोबत काम करण्याची संधी, इनक्यूबेटर्ससाठी महत्त्वाकांक्षी नवउदयोजक, स्टार्टअप्स, इतर इनक्यूबेटरकडून प्रशिक्षणाच्या संधी निर्माण होतील. गुंतवणूकदांना आशादायक स्टार्टअपसोबत जोडण्याची संधी मिळेल. इनोव्हेटर्ससाठी स्टार्टअप योजना, शासकीय लाभ, यशस्वी स्टार्टअप, इनक्यूबेटर इत्यादींबद्दल माहिती या एक्सपोत मिळेल. उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन, इन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीच्या संधी या मेळाव्यात तयार होतील. यासाठी अधिकाधिक संख्येत स्टार्टअप्स, इनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री लोढा याने केले आहे.

महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना,उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८” जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या माध्यमातून इच्छुकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असेही मंत्री लोढा म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor Bais attends Bhagwat Katha

Thu Dec 7 , 2023
  Mumbai :-Maharashtra Governor Ramesh Bais attended the Shrimad Bhagwat Katha organised by Smita Thackarey at Mukkti Cultural Center at Andheri, Mumbai. The Governor listened to the Katha presented by Tulsi Maharaj of Vrindavan and performed Aarti. Chairperson of Mukkti Foundation Smita Thackeray welcomed the Governor. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com