संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी : स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या विशेष दिवस कार्यक्रम समिती, एन.सी. सी. आणि इतिहास अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती (पराक्रम दिवस) महाविद्यालयाच्या ग्रंथालय कक्षात उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. विशेष दिवस कार्यक्रम समितीचे संयोजक व इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतांना राष्ट्राचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाचे चित्रण केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विनय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना नेताजींच्या मार्गावर चालण्याचे आव्हान केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनीष चक्रवर्ती यांनी स्वातंत्र्य चळवळीतील नेताजींच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. रेणू तिवारी यांनी लक्ष्मीबाई रेजिमेंटबद्दल बोलतांना नेताजींच्या मातृशक्तीबद्दलच्या विचारांना आदरांजली वाहिली. इतिहास अभ्यास मंडळाचे सल्लागार डॉ.जयंतकुमार रामटेके यांनी नेताजींकडून नेतृत्वगुण घेण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी डॉ.सिद्धार्थ मेश्राम, डॉ.अझहर अबरार, ग्रंथपाल शिल्पा हिरेखान, डॉ.किशोर ढोले, डॉ.विकास कामडी, डॉ.महेश जोगी, व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संचालन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ जितेंद्र सावजी तागडे तर आभार एन.सी. सी. कार्यक्रम अधिकारी लेफ्टनंट मोहम्मद असरार यांनी मानले.