संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- समाजकार्य महाविद्यालय, कामठी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या तर प्रमुख वक्ता म्हणून प्रा. उज्ज्वला सुखदेवे यांची उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी प्रास्ताविक भाषणातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा वेध घेतला. प्रमुख वक्ता प्रा. उज्ज्वला सुखदेवे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा देदीप्यमान जीवनपट आपल्या भाषणातून मांडला. अध्यक्षीय भाषणातून डॉ. रुबीना अन्सारी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अधोरेखित केला. संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार प्रा. गिरीश आत्राम यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ. ओमप्रकाश कश्यप, डॉ. मनोज होले, डॉ. सविता चिवंडे, डॉ. हर्षल गजभिये, प्रा.राहुल जुनगरी, प्रा. आवेशखरणी शेख, वसंता तांबडे, नीरज वालदे, शशील बोरकर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.