संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन 22 ऑगस्ट ला ऍडव्होकेट दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी येथे रक्षाबंधनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला सोबतच वृक्षाला सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राखी बांधण्यात आली.
या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अफजल मेहंदी यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना राखीची भेट म्हणून शालेय बॅगचे वितरण केले व मिठाईचे वाटप केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुस्तान पेट्रोलियम नेरीचे संचालक अफजल मेहंदी तसेच मॅनेजर व माजी विद्यार्थी स्वप्निल डाबरे आणि नेरी ग्रा प च्या सरपंच सुजाता पाटील व उपसरपंच देविदास वंजारी , पोलीस पाटील रूपाली वंजारी, जि प प्राथमीक शाळेच्या मुख्याध्यापिका सरवी ठाकरे , ग्रामपंचायत सदस्य योगेश झोड, सुरज ठोंबरे, शाळेचे माजी विद्यार्थी इंजिनीयर यशवंत वंजारी व नागेश वंजारी उद्योजक ग्रा प सदस्य रूपालीताई जुनघरे, आशा पाटील , कांता मॅडम, जि प प्राथ.शाळेचे प्रशांत मेश्राम,, एडवोकेट दादासाहेब कुंभारे विद्यालय चे मुख्याध्यापक राजेश गजभिये उपस्थित होते. तसेच नवीन पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल चव्हाण, धुळे सह शेळके, अजित बागडे, सुशील तायडे, अरविंद वंजारी, मोतिराम वंजारी, रोशन वंजारी हे सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन भैयालाल भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित चव्हाण यांनी केले.