नागपूर :- सौरऊर्जेचे महत्त्व जाणत वर्धा जिल्ह्या अंतर्गत आर्वी तालुक्यातील नेरी (पुनर्वसन) या गावाने शंभर टक्के सौरग्राम होण्याचा मान मिळवित राज्यातील सर्वात मोठे सौरग्राम होण्याचा मान मिळविला आहे ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय आणित जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ही किमया करुन दाखविली आहे.
सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणा-या या गावात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही किमया साध्य करणा-या या गावाने संपुर्ण राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महावितरणकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान 2 गावे 100 टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून या मोहिमे अर्गत वर्धा जिल्ह्यातील चिचघाट-राठीच्या पाठोपाठ या नेरी (पुनर्वसन) गावातील सर्व 132 घरगुती ग्राहक आणि ग्रामपंचायतीने त्यांच्या छतावर सौर ऊर्हा निर्मिती प्रकल्प उभारली आहे. या गावाची सौर ऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे 150 किलोवॅट झाली आहे.
वर्धा शहरापासून 50 किमी तर आर्वी पासून अवघ्या 2 किमीच्या अंतरावर असलेले आणि महावितरणच्या आर्वी उपविभाग अंतर्गत असलेल्या नेरी (पुनर्वसन) या गावाला सौरग्राम करण्यासाठी आर्वी पंचायत समितीने या गावात जवळपास वर्षभर असलेल्या स्वच्छ सुर्यप्रकाशाचा वापर करून वीज निर्मिती करणाच्या मानस करित महावितरणच्या अवाहनाला अनुकुल प्रतिसाद देत केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान सुर्यघर’ – मोफ़त वीज योजनेत सहभागी होण्याचा प्रस्ताव तयार करून वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला, सौरऊर्जेचे महत्व जाणून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील त्यास अनुकूल प्रतिसाद देत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावास मंजुरी दिली. महावितरण, गावकरी, पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या एकत्रित प्रयत्नांतून नेरी (पुनर्वसन) हे गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करुन एकजुटीने ‘सौर’ उड्डाण यशस्वी केले आहे.
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, संचालक (संचालन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या निरंतर मार्गदर्शनात आणि प्रादेशिक संचालक, नागपूर परेश भागवत, कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) धनंजय औंढेकर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, वर्धा मंडलाच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रदिप घोरूडे यांच्या विशेष पुढाकाराने आर्वी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत गायकवाड, उपकार्यकारी अभियंता अमित गायकी, सहायक अभियंता रुपेश सोनटक्के प्रधान तंत्रज्ञ रामटेके व बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ पवन मुंजेवार यांच्या अविरत प्रयासाने नेरी (पुनर्वसन) या गावाला विदर्भातील पहिले सौरग्राम होण्याचा बहुमान मिळाला आहे.