बेवारस बॅगने प्रचंड खळबळ

नागपूर –  मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बॅगने चांगलीच खळबळ उडाली. भारवाहकाने लक्ष वेधल्यानंतर दोन्ही बॅगची तपासणी करण्यात आली. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही बॅग ताब्यात घेतल्या. बॅगमालकाशी संपर्क सुरू आहे. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली.
शनिवारी दुपारी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दाराजवळ आकाशी आणि लाल रंगाच्या दोन बॅग बèयाच वेळपासून ठेवल्या होत्या. कुलींची ये-जा असल्याने या बॅगकडे सतत लक्ष होते. मात्र, बराच वेळ होवूनही बॅग मालक आला नाही. त्यामुळे भारवाहक बांधवात कुजबुज सुरू झाली. दरम्यान भारवाहन संघटनेचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांनी पुढाकार घेवून ही माहिती आरपीएफला दिली. बेवारस बॅग असल्याने स्कॅqनग मशिन मध्ये तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. तपासणी केल्यानंतर साèयांनीच सुटकेचा श्वास घेतला.
या बाबत लोहमार्ग पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस शिपाई रंजना कोल्हे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. बॅगमध्ये नवीन कपडे आणि बुटीबोरीतील एका खाजगी रूग्णालयाची फाईल मिळाली. तसेच एक मोबाईल नंबरही मिळाला. त्यावर पोलिस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार या दोन्ही बॅग एका प्रवाशाच्या आहेत. त्यांनी रेल्वे स्थानकाच्या क्लॉक रूममध्ये ठेवल्या होत्या. गावाला जाण्यासाठी आज सकाळीच बॅग घेवून आला. मात्र, धावपळीत विसरले असावेत. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कामावर परतण्यास संपकऱ्यांचा नकार

Sun Jan 2 , 2022
-रूजू होण्यास तयार नाही नागपूर – मागच्या वर्षातील आंदोलन नव्या वर्षात पोहोचले. मात्र, संपकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अनेक प्रयत्न केल्यानंतरही संपकरी कामावर परण्यास तयार नाहीत. त्यामुळे एसटी प्रशासनाचे आर्थिक नुकसान तर होत आहेच शिवाय प्रवाशांची प्रचंड गैरसोय आहे. प्रवाशांना दुप्पट भाडे देवून प्रवास करावा लागतो. सुरक्षित प्रवासाची हमी नसली तरी पर्याय नसल्याने सामान्य प्रवासी दुप्पट भाडे देतात. नव्या वर्षाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com