संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– आदिवासी भागांमध्ये अत्याधिक आवशक्ता
नागपूर :- नवजात मुलांसाठी जीवनदायी ठरलेल्या न्यू बॉर्न स्टेबिलायजेशन युनिटची (एनबीएसयू) देशभरातील आरोग्य केंद्रात संख्या वाढवावी. विशेषता आदिवासी भागात याची अत्याधिक गरज आहे अशी मागणी खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत केली आहे.
खासदार तुमाने यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून न्यूबॉर्न स्टेबिलायजेशन युनिट स्थापना व त्याचा होणारा फायदा याविषयी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी दिली आहे. या प्रश्नावर उपप्रश्न उपस्थित करून खासदार तुमाने उपरोक्त मागणी केली. खासदार तुमाने यांच्या प्रश्नातून देशभरात २ हजार ७७४ एनबीएसयू स्थापित असल्याची माहिती दिली.उत्तर प्रदेशात ३३५, राजस्थान २८४, गुजरात २६२ या राज्यात सर्वाधिक एनबीएसयू आहेत. तर महाराष्ट्रात १९९ एनबीएसयू असल्याची माहिती समोर आली आहे. एनबीएसयूच्या स्थापनेनंतर बाल मृत्यू दरात घट झाली आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्या नमुना नोंदणी प्रणाली अहवालानुसार २०१४ मध्ये १००० बालकांमागे शिशु मृत्यू दर ३९ होता तर २०२० च्या आकडेवारीनुसार हा बालमृत्यूदर २८ झाला आहे. यात घट झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात १९९ एनबीएसयू युनिट कार्यरत आहेत. आदिवासी भागात ही युनिट वाढवावी अशी मागणी उपप्रश्नाच्या माध्यमातून केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात एनबीएसयू युनिटची संख्या कमी असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी मान्य केले आहे. काही ठिकाणी या मशीन खराब झाल्या आहेत. अशा वेळी त्यांना इतर ठिकाणी जावे लागते, दुसऱ्या गावात जावून ही सुविधा घ्यावी लागगते, त्यासाठी आवश्यक असलेली सुविधा करावी, आदिवासी क्षेत्रात शस्त्रक्रीयेसाठी काय सोयी असल्याचे त्यांनी विचारले. त्यावर मोदी सरकार लहान मुलाच्या आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी तत्पर असून त्यांना सुविधा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.