पवनी तालुक्यातील पुरग्रस्तांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ भरीव मदत करा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

पवनी :- भंडारा जिल्ह्यात 11 व 12 सप्टेंबर ला वैनगंगा नदीच्या पुरामुळे व सतत दोन दिवस सततधार झालेल्या पावसामुळे पवनी तालुक्यातील अडयाळ, कोंढा, आसगांव, सावरला या क्षेत्रात भीषण पुर परिस्थिती निर्माण झाल्याने धान उत्पादन शेतक-याचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.

तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपिक पाण्याखाली आल्यामुळे शेतकरी मायबाप हवालदील झाला असुन रोहनी झालेल्या हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे नुकसान झाले होते. या पुरातुन सावरत शेतक-यांनी दुबार पेरणी केली तर काहींनी खत व औषधाची फवारणी केल्याने धानपिक जोमात आले होते. सध्या स्थितीत धानपिक लोंबीवर आले असताना अचानक निसर्गाचा प्रकोपामुळे धानपिकाची नुकसान झाली. गोसे खुर्द धरण्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने वैनगंगा नदी तुडूंब वाहू लागली. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतक-यांचा शेतात मर्यादेपेक्षा अधिक पाणी साचल्याने धानपिक पाण्याखाली आले आहेत. धानपिक सलग पाण्याखाली असल्याने धानपिक कुजण्याच्या स्थितीत असुन कसल्याही प्रकारचे जावक अटिचे निर्बंध न लावता शेतक-याचे शेताचे तात्काळ पंचनामे करून त्यांना भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने केला

निवेदन देतेवेळी भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम तालुकाध्यक्ष कुणाल पवार ,सचिव राकेश हटवार, कार्याध्यक्ष घनश्याम वंजारी, शहर अध्यक्ष निखिल गोंडाने शहर सचिव रवि भिसेकर व अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष परवेज खान, अल्पसंख्याकांचे शहर अध्यक्ष साहिल शेख, सदस समीं शेख, गोलू बेग, मौशुब पठाण, शंकर लोणकर, योगेश सेलोकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी १०९८ हेल्पलाईन क्रमांक 

Fri Sep 20 , 2024
– ‘येता संकट बालकावरी १०९८ मदत करी’ नागपूर :- संकटग्रस्त बालकांना त्वरित मदत पुरविण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ कार्यान्वित केला असून या सेवेचा संकटग्रस्त बालक किंवा या बालकास मदत करणाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभाग-नागपुरचे विभागीय उपायुक्त ऐ.जे. कोल्हे यांनी केले आहे. बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरविलेली बालके, सापडलेली बालके, मतदीचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com