ॐ महाकाली मंदीरात सोमवार ला घट स्थापनाने नवरात्री उत्सवाचा शुभारंभ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- नागपुर जिल्हयातील गंगा समान पावन कन्हान नदीच्या काठावर वसलेले प्रसिध्द ‘क’ तिर्थ क्षेत्र असलेले ॐ महाकाली मंदिर सत्रापुर रोड कन्हान येथे ॐ महाकाली सेवा समिती कन्हान-सत्रापुर व्दारे अश्विन नवरात्री निमित्य दरवर्षी प्रमाणे अश्विन शु्क्ल पंचमी सोमवार (दि.७) ऑक्टोबर २०२४ ला सकाळी १० वाजता सनद गुप्ता यांचे हस्ते घट स्थापना करून नवरात्री उत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.नव दिवस पुजा, अर्चना, सकाळी, सायंकाळी आरती आणि भजन, जस असे विविध धार्मिक कार्य क्रमाचे आयोजन करून नवरात्र उत्सव थाटात साजरा करण्यात येणार आहे. करिता परिसरातील सर्व भावि क भक्त मंडळींनी निर्धारित वेळेत उपस्थिती राहुन ॐ महाकाली मातेच्या दर्शनाचा तसेच धार्मिक कार्यक्रमा चा लाभ घ्यावा. असे आवाहन ॐ महाकाली सेवा समिती कन्हान-सत्रापुर चे सचिव प्रकाश कडु हयानी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बीकेसीपी शाळेच्या अनन्या मंगर ला जूनियर राज्य मैदानी खेळ स्पर्धेत रजत पदक

Sun Oct 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – महाराष्ट्रात नागपुर जिल्हयाचे नावलौकिक केले कन्हान :- पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्य स्तरीय जूनियर एथलेटिक्स स्पर्धेत बीकेसीपी शाळेची विद्यार्थीनी अनन्या मंगर हिने विजयश्री मिळवित रजत पदक प्राप्त करून कन्हान शहर व नागपुर जिल्हयाच़े महाराष्ट्रात नाव लौकिक केले. राज्य स्तरीय जूनियर एथलेटिक्स स्पर्धेत अनन्या मंगर ने उत्कुष्ट प्रदर्शन करित एथलेटिक्स ट्रायथलॉन इवेंट १४ वर्ष वयोगटातील मुलीच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!