संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – शहरात आणि परिसरातील तीस गावात देवी मातेच्या मंदिरात व सार्वजनिक उत्सव मंडळाने कलश, कावड यात्रा, विधिवत पुजा अर्चना करून घट स्थापना व देवी मुर्तीची स्थापना करून नवरात्र महोत्स वाची थाटात सुरूवात करण्यात आली. मंदिरात व सार्वजनिक मंडळाने विविध भजन कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल करून कन्हान नदी पात्रात दोन दिवस घट विर्सजन आणि देवी मुर्तीच्या विर्सजनाने नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात आली.
शहरात आणि परिसरात नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु मागील दोन वर्ष संपुर्ण देशात कोरोनाचे थैमान पसल्याने शासनाने सण उत्सवावर बंदी घातल्याने नागरिकांनी सण,उत्सव आपल्या घरोघरी परिवारा सोबत साजरे केले. सध्या च्या परिस्थितीत कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणात अस ल्याने शासनाने निर्बंध हटविल्याने सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असल्याने सोमवार (दि.२६) सप्टेंबर ला कन्हान शहरात भव्य कलश, कावड यात्रा काढुन आणि ग्रामिण भागातील देवी मातेच्या मंदिरात व सार्वजनिक उत्सव मंडळाने विधिवत पूजा अर्चना करून घट स्थापना व देवी मुर्तीची स्थापना करून नव रात्र महोत्सवाची थाटात सुरूवात करण्यात आली. नव दिवस दररोज सकाळ, सायंकाळ आरती, दुपारी भजन कीर्तन, रात्री जस गायन, जागरण, सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा सह अनेक विविध धार्मिक कार्यक्रमा चे आयोजनाने नऊदिवस धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. नवमी च्या दिवशी महाप्रसादाचा भाविक भक्त मंडळीने लाभ घेतला. बुधवार (दि.५) व गुरुवार (दि.६) ऑक्टोंबर या दोन दिवस कन्हान नदी महाका ली मंदीर घाटाच्या नदी पात्रात घट विर्सजन आणि देवी मुर्तीच्या विर्सजन करून नवरात्र महोत्सवाची थाटात सांगता करण्यात आली.