नागपूर :- केंद्रशासनाच्या जवाहर नवोदय विद्यालय नायगाव खैरी तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथे शिक्षण घेतलेल्या सांग 1986 पासूनच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून नागपूर नवोदय विद्यालय अलुमिनी वेलफेअर व चॅरिटेबल असोसिएशन (NNAWCA) या नावाची संस्था स्थापन करून या संस्थेचे धर्मादाय आयुक्त यांचे कडे रीतसर नोंदणीकृत करून काल दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी संस्थेच्या वेब पोर्टलचे विधिवत उद्घाटन जवाहर नवोदय विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक नीलकंठ मेहर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोतमारे, उपाध्यक्ष पुष्पकेतन चौरागडे, सचिव महेंद्र शेंडे, सह सचिव प्रशांत बोडखे, प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोतमारे यांनी संस्थे चा परिचय देताना सांगितले की जवाहर नवोदय विद्यालय नागपूर : याची सुरुवात 1986 पासून झाली. या शाळेमध्ये शिकणारे गुणवंतापूर्ण विद्यार्थी भारतात व भारताबाहेर विविध पदावर काम करून आईचे नाव लौकिक करीत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्या शिक्षणचा समाजासाठी वापर क सा करता येईल यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. विविध ठिकाणी काम करणाऱ्या जवाहर न वोदय विद्यालय नागपूरच्या माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचे व ते दहावीत असलेले समाज कार्याचे सर्वांना माहिती व्हावी यासाठी वेब पोर्टल बनविण्यात येऊन त्यांच्या द्वारे करण्यात येणाऱ्या कार्यक्रमा ची माहिती सर्वांना व्हावी यासाठी आज रोजी वे पोर्टलचे विधिवत उद्घाटन करण्यात आल्याचे सांगित ले. यावे पोर्टल द्वारे समाजाला व जवाहर नवोदय विद्यालय नागपूरच्या माजी विद्यार्थ्यांना आपापली माहिती या पोर्टलवर उपलब्ध करून देता येणार आहे व गरजूंना या माहितीचा समाजासाठी वापर करता येणार असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोतमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी संस्था उपाध्यक्ष पुष्पकेतन चौरागडे सचिव महेंद्र शेंडे सहसचिव प्रशांत बोडके व कोषाध्यक्ष प्रकाश नारे यांनी आपापले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिंद्र शेंडे यांनी तर आभार सौ. मेघा अमृते यांनी केले. यावेळी जवाहर नवोदय विद्यालयाचे सोंग 1986 सूनचे माजी विद्यार्थी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.