पिपरी-कन्हान येथे १५ ऑक्टोंबर ला भव्य कावड यात्रे सह नवदुर्गा महोत्सव

– सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे नवदुर्गा महोत्सवाचे आयोजन

कन्हान :- सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे नवदुर्गा महोत्सवाचे आयोजन करित जय्यत तयारी व नियोजन करून नवदुर्गा मंदीर पिपरी-कन्हान येथे (दि.१५) ऑक्टोंबर ला भव्य कलश, कावड यात्रे सह नवदुर्गा महोत्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे.

पिपरी-कन्हान येथील पुरातन दुर्गा चौक येथे भोसलेंच्या काळापासुन येथे छोेटेशे नवदुर्गेचे मंदीर अस्तित्वात असल्याचे जानकारांचे मत आहे.सुरूवाती ला या चौकात नवरात्र मध्ये नऊ दिवस नवदुर्गेची मुर्ती बसवुन पुजा अर्चना करून दस-याला सकाळी कन्हान नदीच्या पावन पात्रात मुर्ती विसर्जन आणि सायंका ळी रावन दहन करून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असे. काही वर्षानी येथील भाविकानी वर्गणी गो ळा करून मंदीर बनवुन त्यात संगमरमरी नवदुर्गेची मूर्ती आणुन अभिषेकासह स्थापना केली. या मंदिरा तील नवदुर्गा देवीचा आशिर्वादाने इच्छीत सर्व मनोका मना पूर्ण होतात अशी पिपरी-कन्हान येथील भाविकां ची श्रद्धा असल्याने नवरात्र मध्ये दुर दुरवरून भाविक येउन दर्शन घेत असल्याने दरवर्षी कन्हान नदीचे पावन जल कलश, कावड यात्रेने आणुन नवदुर्गा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो.

सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे ६५ व्या वर्षी सुध्दा जय्यत तयारी व नियोजन करून रविवार (दि.१५) ऑक्टोंबर २०२३ ला सकाळी ९ वाजता कन्हान नदी पात्रातील पावन जल पुजा अर्चना करून कलश मध्ये भरून कन्या डोक्यावर कलश व पुरूष कावड खांदयावर घेऊन नवदुर्गेचे नऊ रथ, भजन मंडळी, ढोल, ताशे व डिजेच्या मधुर सुरात ” जय माता दी”, ” नवदुर्गा माता की जय ” च्या जयघोषात भव्य कलश, कावड यात्रा बीकेसीपी शाळेपासुन काढुन कन्हान च्या मुख्य महामार्गाने बस स्टाप, डॉ आंबेडकर चौक आणि तेथुन पिपरी रोड ने नवदुर्गा मंदीर पिपरी ला पोहचुन देवीचे दुध, जल अभिषेक, पुजा अर्चना व घटस्थापना करून आरती सह नवदुर्गा महोत्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे. दररोज नऊ दिवस महाआरती सकाळी ८ वाजता व सायंका ळी ७ वाजता आणि धार्मिक व विविध कार्यक्रम वेळे वर सुचित करण्यात येईल. रविवार (दि.२२) ऑक्टों. ला सायं. ४ वाजता अष्टमी महायज्ञ, २१ हवन कुंड पुजन, सोमवार (दि.२३) ला सायंकाळी ६ वा. पासुन भव्य महाप्रसाद, मंगळवार (दि.२४) ला सकाळी ९ वा .घटविसर्जन, सायंकाळी ७ वाजता रावण दहन करून नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात येईल. नवदुर्गा महोत्सवाच्या यशस्विते करिता सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी- कन्हानचे मार्गदर्शक मा. प्रकाश भाऊ जाधव, नानकराम मोटवाणी, राधेश्याम भोयर, वासुसेठ झमतांनी, अजय भोस्कर, कार्यकारी अध्यक्ष देवा चतुर, उपाध्यक्ष अमोल सुटे, शितल भिमनवार, सचिव फजित खंगारे, कैलाश पवार, कोषाध्यक्ष प्रमोद मोटवानी, बाला खंगारे, सहकोषाध्यक्ष मनोज कुरडकर, प्रशांत मसार, सर्व सदस्य गण व समस्त ग्रामस्थ नागरिक परिश्रम घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिंचन महामंडळ : 6257 रिक्त पदासाठी बसपाचे शिष्टमंडळ भेटले

Fri Oct 13 , 2023
नागपूर :-विदर्भातील सिंचन विभाग व प्रकल्पमध्ये 56% रिक्त जागांमुळे सिंचन प्रकल्पाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना व सुशिक्षित बेरोजगारांना बसत आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने विनाविलंब रिक्त जागेवर पद भरती करावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी व विदर्भ प्रदेशचे इन्चार्ज एडवोकेट सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता यांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!