पोरवाल महाविद्यालय कामठी येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीराचा समारोप

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे घोरपड ग्रामपंचायत येथे सात दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्या शिबीराचा आज दि. ७ फेब्रुवारी रोजी समारोप करण्यात आला .

या समारोपीय कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुखपाहुणे उमेश रडके माजी उप सभापती, पंचायत समिती कामठी हे होते. घोरपड ग्रामपंचायतच्या सरपंच ताराबाई कडू ह्या सुद्धा विचारपीठावर उपस्थित होत्या. सोबतच कार्यक्रमासाठी विचारपीठावर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती, ग्रामपंचायत सदस्य गीता पांडे, सुनीता कोर्वेकर, समाजसेवक मुर्लीधर मानमुंढरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. निशिता अंबादे ही सर्व मंडळी उपस्थित होती. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे यांनी केले. त्यात त्यांनी सात दिवस झालेल्या कार्यक्रमाचा सुरवातीपासूनचा आढावा घेतला. आणि या सात दिवसाच्या शिबिरातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात नक्कीच बदल घडून आला अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  उमेश रडके यांनी आपल्या भाषणामधून ह्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांना गाव संस्कृती काय आहे ही नक्कीच या सात दिवसातून कळलेली आहे आणि त्यांच्या भावी आयुष्यामध्ये सुद्धा त्याचा फायदा त्यांना होईल अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. ह्या सात दिवस चाललेल्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना काय साध्य झाले त्याचा शोध घेतांना  सहा विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात पूजा चौधरी यांनी ह्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही टाईम मॅनेजमेंट शिकलो ते आवर्जून सांगितलं. तर विपुल गजभिये यांनी आम्ही गावातील संस्कृती काय आहे ती प्रत्यक्ष अनुभवली असे सांगितले. पुजा सिंग हिने आम्ही या सात दिवसाच्या शिबिराच्या माध्यमातून बंधुभाव काय असतो ते शिकलो असे सांगितले. नेहा वंजारी यांनी आमचे या सात दिवसांमध्ये इतर विद्यार्थ्यांशी एकप्रकारे आपुलकीचे नाते निर्माण होऊन शिस्त, प्रामाणिकपणा काय असते ते शिकलो असे सांगितले. जयश्री उके ह्या विद्यार्थिनींनी ह्या शिबिरातून स्टेज डेरिंग आम्ही चांगल्या पद्धतीने शिकलो असे सांगितले. आरती सिंग या विद्यार्थिनीने आमच्या मनामध्ये असणारी भीती या शिबिराने पूर्णपणे घालवली असे सांगितले. कुणाल कडू यांनी आपल्या भाषणातून पुन्हा येणारी तीन वर्षे पोरवाल महाविद्यालयाने आमच्या  गावांमध्ये शिबिर आयोजित करावे असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलतांना म्हटले की, या सात दिवसाच्या शिबिरामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तींमत्व विकास नक्कीच साध्य झाला आहे हे विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या  मनोगतावरून सिद्ध झाले आहे. प्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समृद्धी टापरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. निशिता अंबादे यांनी केले. या श्रमसंस्कार शिबिरासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. दीपक भावसागर, डॉ. राजेश पराते, डॉ. महेश जोगी डॉ. मंजिरी नागमोते ह्या प्राध्यापकांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

Tue Feb 7 , 2023
गडचिरोली : राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय,मुंबई येथे स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र, यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. सदर कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com