संदीप कांबळे, कामठी
कामठी- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित केलेल्या सात दिवसीय श्रमसंस्कारांचा आज दिनांक 24/3/22 रोज गुरुवार ला चौथा दिवस असून ह्या चौथ्या दिवशी घोरपड ग्रामपंचायत येथे गावकऱ्यांच्या रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये गावातील लोकांचा रक्तगट काय आहे ते सूक्ष्मजीवशास्त्रआणि सूक्ष्म- रसायनशास्त्र विभागाच्या वतीने रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मोहनजी माकडे जिल्हा परिषद सदस्य नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वप्नील राठोड प्रबंधक, सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी हे होते. मोहनजी माकडे यांनी या उपक्रमाचे खूप गोड कौतुक करून गावकऱ्यांमध्ये असणारा रक्त गट पोरवाल महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी तपासून दिल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये एक प्रकारची आरोग्यविषयक जाणीव प्रगल्भ होण्यासाठी फार महत्वाची भूमिका निभावल्यामुळे महाविद्यालयाचे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचे अभिनंदन केले. मंचावर उपस्थित दिनेश ढोले, सदस्य जिल्हा परिषद नागपूर यांनी अशा प्रकारच्या उपक्रमासाठी पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग आणि कार्यक्रम अधिकारी यांना अभिनंदन केले. सचिव उंचेकार यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे कौतुक केले.
स्वप्नील राठोड यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात समस्त गावकऱ्यांना आणि जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना रक्तगट तपासून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विनोद शेंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक राजेश पारते यांनी तर आभाप्रदर्शन डॉक्टर निशिता अंबाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर रागिणी चहांदे यांच्या नेतृत्वाखाली जैव रसायशास्त्र आणि सूक्ष्म जीवशास्त्र या विभागाच्या चमुतील डॉक्टर शालिनी चाहंदे, प्राध्यापक सचिन येरपुडे, प्राध्यापिका आभा मनापुरे आणि विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमा प्रसंगी सरपंच सौ ताराबाई कडू, गीता पांडे, भारती मान मुंध्रे, डॉक्टर दिपक भवसागर, लेफ्टनंट मोहम्मद असरार, डॉक्टर सिद्धार्थ मेश्राम व डॉक्टर प्रशांत धोंगळे उपस्थित होते.