राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 27 :- जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहिम दरवर्षी राबविन्यात येत आहे . भारतामध्ये 13 जानेवारी 2011 नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही यानुसार ही पल्स पोलीओ लसिकरण मोहिम 27 फेब्रुवारीला कामठी तालुका आरोग्य विभाग व शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी च्या वतीने कामठी शहर व छावनी परिषद तसेच ग्रामीण भागातील एकूण 200 केंद्रावर राबविन्यात आला.या पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या मोहिमेअन्तर्गत आज एकून 200 पोलिओ बूथ केंद्रावर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 0 ते 5 वर्षे वयोगटातिल बालकाना पल्स पोलिओ लसिकरण चे डोज पाजन्यात आले.

आज झालेल्या पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेचा शुभारंभ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तालुका आरोग्य अधिकारि डॉ माने यांच्या शुभ हस्ते एका बालकाला पोलिओ लसिकरण चे डोज पाजून करण्यात आले.याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ नयना धुमाळे, डॉ शबनम खाणुनी, डॉ अली आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या पल्स पोलीओ लसिकरण मोहिमेत आज एकूण 200 केन्द्रासह मोबाइल वैन, ट्रांजिस्टर बूथ यासह रेल्वे स्टेशन, बसस्थानक, पंचायत समिति, पोलिस स्टेशन आदि ठिकाणी केन्द्राची व्यवस्था करण्यात आली होती .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कार दुचाकी अपघातात दोन तरुण गंभीर जख्मि

Sun Feb 27 , 2022
– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 27 :- कन्हान पुलिया मार्गावर डबलसीट जात असलेले दुचाकी क्र एम एच 40 ए एच 4266 च्या चालकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात कार ने दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या गंभीर अपघातात दुचाकीस्वार व सहपाठी असे दोन तरुण गंभीर जख्मि झाल्याची घटना आज सकाळी 11 दरम्यान घडली. जख्मि चे नाव सोनू तायडे वय 26 वर्षे व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!