नागपुर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ जनजागरण अभियान अंतर्गत दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार सुधाकर कोहळे यांची प्रमुख उपस्थिती असून प्रमुख अतिथी गिरीश पांडव व गुणेश्वर आरीकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडला. नुकत्याच झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात पिपळा रोड येथील मानमोडे लॉन येथे ओबीसी समाजाला जागृत करणे म्हणजेच समाजाला योग्य परिवर्तनाची दिशा देणे हे होय.
ओबीसी समाज हा शैक्षणिक व वैचारिक दृष्ट्या मागासलेला आहेत. ओबीसी समाजात 376 जाती आहेत. महाराष्ट्रात एवढा मोठा समाज असला तरी जागृत नसल्या कारणाने आरक्षणाचा फायदा घेऊ शकले नाहीत.हे या समाजाचे दुर्दैव मानावे लागेल. सरकारने ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष केल्याने उपासमारीची पाळी आली आहे.ओबीसी समाज शिक्षणापासून वंचित राहून हा समाज बेरोजगार झालेला आहे.या कार्यक्रमांत काही कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले. याकार्यक्रमा अंतर्गत ओबीसी कार्यकर्त्यांनी आप आपले मत व्यक्त केलेत. आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे आयोजक पद्माकर गावंडे, विजय पटले, डॉ.खुशाल बोपचे, सुधाकर कोहळे, गुड्डू रहंगडाले, शरदचंद्र वानखेडे, सचिन संजू पन्नासे, राजेशराव रहात, राजकुमार धुळे, भैयाजी रडके, रोशन कुंभलकर, राजू चौधरी, जयंता चौधरी, पृथ्वीराज रहंगडाले, देवानंद टेमरे, नरेश सालपे, मुन्ना नागेश्वर, रामेश्वर खेडे, चंद्रशेखर बोरकर, चंदू दाऊदकर आदी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते