भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारक महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. ऐन नवरात्रोत्सवातच न्यायालयाने हा निकाल दिल्याने महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला खऱ्या अर्थाने बळकटी मिळणार असून भिडे वाड्यात उभारण्यात येणारे राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा, प्रोत्साहन, बळ देईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरु करुन महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळे देशाला महिला शिक्षणाचा विचार व दिशा मिळाली. ज्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु झाली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याची राज्य सरकारची अनेक वर्षापासूनची योजना होती. त्या जागेबाबत तेथील पोटभाडेकरुने न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे या स्मारकाचे काम रखडले होते. गेल्या अनेक वर्षापासून या न्यायालयीन लढ्यात अनेक जण सक्रिय सहभागी होते. या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठीच्या लढ्याचा मी देखील साक्षीदार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पोटभाडेकरुची याचिका फेटाळून ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे भिडे वाड्यात उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी फुले दाम्पत्याच्या कार्याला साजेसे राष्ट्रीय स्मारक राज्य सरकारच्यावतीने उभारले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“उद्योजकता मिशन”द्वारे राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Tue Oct 17 , 2023
– मिशनच्या पहिल्या टप्प्याचा सहा जिल्ह्यांमध्ये शुभारंभ मुबई/नागपूर :- भांडवलासोबतच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, उद्योजक, अशी साखळी निर्माण करुन जागतिक संधी प्राप्त करण्यास महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन सहाय्यभूत ठरेल आणि राज्य विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. रोजगार निर्मिती व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व ग्लोबल अलायन्स फॉर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!