नवी दिल्ली :- 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तर्फे 14 जून 2024 रोजी पुणे येथील खडकवासला येथे कार्यशाळा आयोजित केली गेली. या कार्यशाळेला तिन्ही सेवांमधील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यशाळेचा एक भाग म्हणून,शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.कार्यशाळेत ध्यान, प्राणायाम, आसन अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.भारतीय सशस्त्र दलातील प्रशिक्षित योग प्रशिक्षकांनी योग्य आसन आणि श्वासोच्छवासाचे तंत्र सर्वांना दाखवले, तसेच उपस्थितांना त्यांनी योगाचे फायदेही सविस्तरपणे सांगितले. कार्यशाळेने सर्व उपस्थितांवर योगविषयक प्रसिध्दी करून आणि निरोगी जीवनशैली आणि सर्वांगीण आरोग्याच्या महत्त्वाविषयी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या बंधुत्वाला जागृत करून एक जबरदस्त प्रभाव निर्माण केला.