नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल; पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार

नवी दिल्ली :- अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ४ जून रोजी निकाल लागला. यंदाचा निकाल अनपेक्षित आणि सर्वच राजकीय विश्लेषक आणि एक्झिट पोल्सना धक्का देणारा ठरला. भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात येत असतानाच प्रत्यक्षात मात्र भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. याचा अर्थ बहुमताचा २७२ हा आकडा गाठण्यासाठी आता त्यांना इतर सहयोगी पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने देशभरात चांगली कामगिरी करत ४४ खासदारांच्या संख्येवरून थेट ९९ वर मजल मारली आहे. तसेच इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांचीही कामगिरी उत्तम राहिली. ज्या उत्तर प्रदेशवर भाजपाची सर्वाधिक भिस्त होती, तिथे समाजवादी पक्षाने ३७ जागा मिळवून तिसरा सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने २९ जागा मिळवत चौथ्या क्रमाकांचा मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे. आता बहुमताचा आकडा गाठण्यात कुणाला यश येते? हे पाहावे लागेल.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गडचिरोली : सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला आघाडी, भाजप आमदारांच्या सुमार कामगिरीची सर्वत्र चर्चा

Wed Jun 5 , 2024
– दोनवेळा मोदी लाटेत निवडणून आलेले भाजपचे अशोक नेते यांचा काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी तब्बल १ लाख ४१ हजार ६९६ मतांनी दारुण पराभव केला गडचिरोली :- दोनवेळा मोदी लाटेत निवडणून आलेले भाजपचे अशोक नेते यांचा काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी तब्बल १ लाख ४१ हजार ६९६ मतांनी दारुण पराभव केला. पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या किरसान यांच्या विजयाने जिल्ह्यात काँग्रेसला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com