वाडी :- नगर परिषद वाडी ला आता पर्यंत सात निवेदन,एक मोठे आंदोलन व 16 दिवस उपोषण तरी ना नप प्रशासनाला होष ना ठेकेदाराला होश एक मेकाच्या सहकार्याने कामगाराच्या टाळूवरचे लोणी खात आहे .म्हणून कंत्राटी कामगारांच्या शोषण विरोधात नप वाडी वर धडक मोर्चा नेला . माहितीच्या अधिकाराखाली सर्व ठेकीदरांची कुंडली बाहेर काढली ठेकेदार किमान वेतन नुसार पीएफ सुधा भरत नाही.किमान वेतन 16260 रुपये पगार देत नाही दोन दिवसा पूर्वी नप मुख्यधिकारी यांना मनसे वाडीतील शिष्टमंडळ भेटले आणि होत असलेल्या शोषणा बाबत सविस्तर माहिती दिली परंतु सी ओ कामगारणा द्यायचे सोडून लेबर बंद करण्याची धमकी देत होते jcp ने काम करू लेबर ठेवणार नाही असे बेजबाबदार वकत्व्य संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती कसा काय करू शकतो सफाई कामगार, घंटागाडी कामगार, अग्निशामक कामगार, कार्यालयातील सपोरटिंग स्टॉप, यांची खुले आम किमान वेतन देत डल्ला मारून राहिले किमानवेतनावर pf भरत नाही esic कार्ड दिले नाही मुख्यधिकारी यांच्या डोळ्यासमोर गरीब मजबूर मजदुर लोकांची लूट चालू आहे.तरी प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे अशा फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट का करीत नाही.”आंधळा दळतो आणि कुत्र पीठ खाते” अशी दशा सर्व कंत्राटी कामगाराची झाली आहे.
नप वाडी येथील कंत्राटी गरीब मजबूर मजदुर कामगारांचा प्रश्न जो पर्यंत विषय मार्गी लागणार नाही तो पर्यंत लढाई सुरू राहील “जोर जुलूम की टक्कर मे संघर्ष हमारा नारा हैं “ना झुकेगा ना बिकेगा कामगाराणा न्याय मिळाला नाही तर आक्रमक भूमिका घेतल्या जाईल नप वाडीतील कंत्राटी कामगारांना न्याय मिळण्यासाठी जे काय करता येईल ते करू पण हा लेबरच्या शोषणाचा मुद्दा समाप्त होणार नाही हे नप वाडी प्रशासनाने लक्षात घ्यावे.
मनसे राज्य उपाध्यक्ष राजू भाऊ उंबरकर , जिल्हा अध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे माजी तालुका संघटक दीपक ठाकरे, माजी मनसे तालुका अध्यक्ष अनिल पारखी, दीपक नासरे, सचिन चिटकूले, संतोष पाल, गुड्डू पारधी,सूरज भलावी, विठोबा घुरडे, निलेश भूरसे,शुभम कळंबे, आकाश बाबर,वैभव तुपकर,अजिंक्य वाघमारे, मुकेश मुंडले, बबलू सिंग, वेदांत रांहगडाले,संतोष पाल, रामुजी यादव मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.