नांदेड़ – अविकसित भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड़याच्या मातीतिल पोर दिल्ली दरबारात आपल आढळ स्थान बनवू शकतात असे अनेक वेळा सिद्ध झाले असून त्यात भर म्हणून किनवट/माहुर भागातील भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे युवा नेतृत्व प्रमिल विठ्ठलराव नाईक यांच्या कांग्रेस संगठनामधील समर्पित कार्याची दखल 24अकबर रोड वरील राष्ट्रीय कांग्रेसच्या मुख्यालयाने घेतली असून पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार प्रमिल नाईक यांची निवड़ ऑल इंडिया कांग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड़ झाली आहे ,या निवड़ीचे पत्र ऑल इंडिया कांग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या हस्ते आज दिल्ली येथील पक्ष कार्यालयात देण्यात आले ,असून लवकरच त्यांचावर एका राज्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.प्रमिल नाईक हे विद्यार्थी दशेपासून कांग्रेस पक्षासाठी समर्पित होऊन काम करत असून पक्ष संघटन कौशल्याच्या त्यांना 25 वर्ष्याचा दीर्ध अनुभव आहे.
या पूर्वी ते महाराष्ट्रात राज्यपातळीवर NSUI व महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे महासचिव म्हणून उल्लेखनीय कार्य केल आहे.
संपूर्ण भारत देशातुन बंजारा समाजातुन एवढ्या तरुण वयात राष्ट्रीय समन्वयक या जबाबदारीच्या पदावर जानारे ते देशातील पहिले युवक आहेत.त्यांच्या या निवड़ीमुळे संपूर्ण नांदेड़ जिल्ह्यातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.ऑल इंडिया कांग्रेस कमिटीच्या ओबीस सेलच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड़ झाल्यामुळे,कांग्रेस पक्षाचे केंद्रीय महासचिव मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले , उपाध्यक्ष संजय राठोड,माजी मंत्री डीपी सावंत आ,राजेश राठोड, महासचिव नागपुर शहर काँग्रेस कमिटी आलोक कोंडापुरवार , जितेश अंतापुरकर , भूषण मरसकोलहे , स्वप्निल बावनकर , रोहित खैरवार यांनी प्रमिल नाईक यांचे स्वागत केले आहे.