नाना पटोले यांनी इतिहासाबद्दल माहिती घेऊन बोलावे – भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा टोला

मुंबई :- स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाल प्रांताच्या सरकार स्थापनेवेळी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लीम लीगशी नव्हे तर फजलूल हक यांच्या कृषक समाज पार्टीशी आघाडी केली होती. काँग्रेस – मुस्लीम लीगला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी डॉ.मुखर्जी यांनी कृषक समाज पार्टी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक शी आघाडी केली होती, हा इतिहास आहे. इतिहासातील घटनांबद्दल बोलताना नाना पटोले यांनी पूर्ण माहिती घेऊनच बोलावे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी लगावला आहे.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगाल प्रांतात मुस्लीम लीगशी युती केली होती, अशी धादांत खोटी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यावेळच्या घटनांची तपशीलवार माहिती देत नाना पटोले यांचा जोरदार समाचार घेतला आहे. भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच इतिहासाबद्दलचे आपले अगाध ज्ञान पाजळले आहे. नाना पटोले ज्या बंगाल मंत्रिमंडळाबद्दल बोलले आहेत ते सरकार मुस्लीम लीगचे नव्हते. त्या सरकारचे मुख्यमंत्री होते कृषक समाज पार्टीचे फजलूल हक. फजलूल हक हे समाजवादी विचारांचे आणि कट्टर मुस्लीम लीग विरोधी म्हणून ओळखले जात होते . काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांना सरकार बनविण्यापासून रोखण्यासाठी डॉ. मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील हिंदू महासभा,नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फॉरवर्ड ब्लॉक आणि फजलूल हक यांचा कृषक समाज हे तीन पक्ष एकत्र आले होते. फजलूल हक यांच्या कृषक समाज पक्षाने मुस्लीम लीग च्या फाळणीच्या ठरावाला विरोध केला होता. अशा प्रखर राष्ट्रवादी विचारांच्या फजलूल हक यांच्याशी डॉ. मुखर्जी यांनी हातमिळवणी केली होती.

डॉ. मुखर्जी यांनी मुस्लीम लीगशी कधीच आघाडी, समझोता केलेला नव्हता. उलट काँग्रेसचा इतिहास मुस्लीम लीगबरोबरच्या मैत्रीचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासाचा अभ्यास करणे जमत नसेल तर किमान इतिहास समजून तरी घ्यावा आणि मगच बोलावे, असेही भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मताधिक्याची गुढी उभारण्यासाठी आशीर्वाद द्या! - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Tue Apr 9 , 2024
– तेली समाज बांधवांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन नागपूर :- शिक्षण, आरोग्य, पर्यटन, एव्हिएशन, रोजगार, लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये नागपूरला लौकीक प्राप्त करून देण्याचा गेल्या दहा वर्षांमध्ये प्रामाणिक प्रयत्न केला. उत्तम रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. आता निवडणुकीत विक्रमी मतांची गुढी उभारण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com