– शहरात ठिक-ठिकाणी होणार जंगी स्वागत
नागपूर :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा रविवारी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ भव्य ‘रोड-शो’ करणार आहे. रविवारला दुपारी 12 वाजता प्रियंका गांधीं पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत ‘रोड-शो’ करणार. प्रियंका गांधींच्या नागपुरातील दौऱ्याने महाविकास आघाडीसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची माहिती पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
विकास ठाकरेंनी सांगितले की, राज्यात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आलेल्या प्रियंका गांधीचा नागपुरचा दौरा हा महत्त्वपूर्ण ठरणार. पश्चिम नागपुरातील नागरिकांनी प्रियंका गांधीच्या भव्य ‘रोड-शो’साठी जय्यत तयारी केली आहे. त्यांच्या ‘रोड-शो’ला प्रचंड संख्येने नागरिकांची उपस्थित राहणार असल्याने प्रियंका गांधी यांचे ठिक-ठिकाणी स्वागत करण्यात येणार असल्याचेही विकास ठाकरे यांनी सांगितले.
विकास ठाकरे यांनी सांगितले की, प्रियंका गांधी पहिल्यांदाच पश्चिम नागपुरच्या जनतेसोबत संवाद साधत असल्याने शहर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहेत. यापूर्वी काँग्रेस घराण्यातील इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांचा पश्चिममध्ये प्रचाराच्या निमित्ताने दौरा झाला असला, तरी प्रियंका गांधी यांचा हा पहिलाच पश्चिम विधासभेच्या दौऱ्याची उत्सुकताच आणखी वाढली आहे. पश्चिम नागपुरातील उमेदवार विकास ठाकरेंच्या प्रचारार्थ भव्य ‘रोड-शो’मध्ये प्रियंका गांधींची उपस्थिती ही नवी उर्जा निर्माण करणार. नागपुरात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचे उत्साहात स्वागत शहरात ठिक-ठिकाणी करणार असून महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, अशी माहिती विकास ठाकरे यांनी दिली. प्रियंका गांधीच्या पश्चिम विधानसभाक्षेत्रातील ‘रोड-शो’ हा पुढे मध्य नागपुरात गांधी गेट चौक ते कोतवाली पुलिस स्टेशन मार्गे बडकस चौकापर्यंत मध्य नागपुरचे उमेदवार बंटी शेळकेच्या प्रचारासाठी राहणार.
जन-आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेची सुरुवात शुक्रवारी सकाळी दाभा चौकातून करण्यात आली. सकाळी आठ वाजता परिसरातील देवस्थळांचे दर्शन व पूजन करून जन-आशीर्वाद यात्रेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते. यानंतर जन-आशिर्वाद यात्रा पुढे हनुमान मंदीर, गुरुदत्त सोसायटी, पी. डी. हॉस्पिटल, गजानन मंदीर, व्यंकटेश जीम, डोबी नगर मस्जिद, डोबी ले-आउट, बाळाभाऊ पेठ, गणेश नगर, शिव नगर मार्गाने न्यू शांती- उत्कर्ष सोसायटी येथे यात्रेचा समरोप झाले. यावेळी पश्चिम क्षेत्रातील महिला, पुरुष, तरुण विकास ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी रस्त्यावर दिसून आले. जन आशिर्वाद यात्रेत विकास ठाकरे यांनी जाहिर केलेल्या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादातून त्यांनी ठाकरे यांना प्रचंड मताधिक्याने दुसऱ्यांदा विधानसभेत पाठविण्याचा संकल्प केल्याचे शनिवारी दाखवून दिले. नागरिकांनी स्वंयफूर्तीने यात्रेचे जागोजागी जल्लोषात स्वागत करुन विकास ठाकरेंना विजयाचा आशिर्वाद दिला.