नागपूर – सन 1953 मध्ये माध्यप्रदेशचे तत्कालीन महसूलमंत्री तथा महाराष्ट्रचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पदंश्री रामसिंगजी, प्रतापसिंग आडे ,बाबूसिंग राठोड , मुडे गुरुजी , गजाधर राठोड ,हिरा सदा पवार , सोनबा चंदू नाईक, आदी लोकांना सोबत घेऊन यांनी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या नावाने सामाजिक संघटनेची स्थापना केली. सन 30 जानेवारी 1953 ला यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे पहीले अधिवेश घेतले होते. या अधिवेशनाला उदघाटक म्हणून तत्कालीन रेल्वे मंत्री लालबहादूर शात्री देशचे तत्कालीन आले होते .या प्रित्यर्थ 30 जानेवारी 2022 रोजी यवतमाळ येथे स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे . यासाठी देशातील 18 राज्याचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे 18 प्रदेश अध्यक्ष यांना सोबत घेऊन वरील कार्यक्रमचे आयोजन करण्यात येणार आहे . संघाच्या देशातील प्रदेश अध्यक्षांची दोन दिवसीय बैठक दि 11 व 12 दिसेम्बर रोजी नागपूर येथे होणार असल्याची माहिती प्रा प्रकाश पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
या बैठकीला देशातून आलेले मान्यवर
ऑल इंडिया बंजारा सेवाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंगजी तीलवत व ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ टी सी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दि 11 व 12 डिसेंबर रोजी डॉ अबब्दूल कलाम सभागृह धरमपेठ विज्ञान महाविद्यालय अंबाझरी नागपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .या बैठकीला देशातील 18 राज्याचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे 18 प्रदेश अध्यक्ष उपस्थित राहणार आहे . तसेच राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहे .त्या मध्ये राष्ट्रिय महासचिव रामा नायक , राष्ट्रीय महासचिव तुकाराम पवार , राष्ट्रीय युवा अध्यक्ष धनराज राठोड ,दिल्ली प्रदेश अध्यक्ष जयपाल राठोड ,हरियाणा प्रदेश अध्यक्ष अशोक बडतीया , राजस्थान प्रदेश अध्यक्ष सुरेश बंजारा , गुजरात प्रदेश अध्यक्ष जितेंद्र बंजारा ,मध्यप्रदेश अध्यक्ष सज्जनसिंग बबलू , उत्तरप्रदेश अध्यक्ष सतिशचंद नायक , छत्तीसगड अध्यक्ष सदाशिव नायक ,ओडिशा अध्यक्ष धनु नायक तेलनगणाचे अध्यक्ष टी किशनसिंग , अंधरप्रदेश प्रदेश अध्यक्ष डॉ लक्ष्मण नायक , तामिळनाडूचे अध्यक्ष ऍड आर रमेश ,कर्नाटक अध्यक्ष पांडुरंग परमार , गोवा प्रदेश अध्यक्ष गणेश लमानी , हिमाचल प्रदेश अध्यक्ष विषणसिंग राठोड ,काश्मीरचे अधक्ष मुक्तर सिंग कालिया , महाराष्ट्र अधक्ष राजपाल राठोड ,पंजाबचे अध्यक्ष लखरम लालका ,केरळचे प्रदेश अध्यक्ष गोल्डन मुर्गण आदी मान्यवर उस्थितीत राहणार आहे
मागण्या
1) संपूर्ण भारतात बंजारा समाज 27 उपजातीने ओळखल्या जातो , जसे बंजारा , गोरमाटी , लमाण ,लभान , मथुरा बंजारा , मारू बंजारा , लादेनिया बंजारा ,चारण बंजारा ,भाट बंजारा , बळ दिया बंजारा , सुगाळी , मारू बंजारा , यांचे नाव जरी वेगवेगळे असेल मात्र यांची भाषा मात्र संपूर्ण देशात एकच आहे ती म्हणजे गोरबोली
आज संपूर्ण देशात गोरबोली भाषा बोलणारे 12 ते 13 कोटी बंजारा आहे मात्र अनेक राज्यात वेगवेळ्या सूचित समावेश आहे त्या साठी बंजारा ज्या राज्यात अनुसूचित जमातीत नाही त्या राज्यात त्यांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्याव्या . गोरबोली भाषेचा 8 व्या सूचित समावेश नाही ।करीता आमची मागणी आहे की राज्य शासनाने या साठी केंद्रा कडे शिफारशी करावी .
2) इंग्रजांच्या काळा पासून बंजारा समाज विस्थापिताचे जीवन जगत आहेत .,त्यांच्या तांड्याला महसुलीचा दर्जा द्व्या व तांड्यात आरोग्य ,शिक्षण , निवासची व्यवस्था करावी . त्यांना वनविभागाने शेती साठी जमीन द्यावी .
3)कर्नाटक राज्याने आपल्या राज्यात तांडा विकास मंडळ स्थापन केले आहे त्याच धर्ती वर देशात तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तयार करावे .
4)नोकरीत पदोन्नती द्यावी
5)क्रिमिलियारची अट रद्द करावी