नागपूर ग्रामीण सर्व पोस्टे अंतर्गत नविन कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

नागपूर :- भारत सरकारने देशातील जुने कायदे बदलले आहे. त्यासोबत नवे कायदे संमत केले आहे. १) भारतीय न्याय संहीता २०२३ २) भारतीय साक्ष अधिनियम २०२३ ३) भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ सदर कायदयाचे ०१ जुलै २०२४ रोजी अंमलबजावणी होणार असुन त्या अनुषंगाने मा. श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत दिनांक ०१/०७/२०२४ रोजी नवीन कायदे अंमलबजावणी बावत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे जनजागृती कार्यशाळा (कार्यक्रम) आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास डॉ. कृष्ण कुमार पांडे कुलसचिव, डॉ. मधुसूदन पेना संचालक वारंगा परिसर, डॉ. हरिकृष्ण वस्ती संचालक रामटेक परिसर, रमेश बरकते उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक, प्रशांत काळे पोलीस निरीक्षक रामटेक तसेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, पोलीस पाटील, पत्रकार, सरपंच व पोलीस स्टेशन मधील अधिकारी, अंमलदार हजर होते. तसेच अपर पोलीस अधीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन काटोल येथे नवीन तिन कायदे बाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे नागपूर ग्रामीण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक रमेश बरकते, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग उमरेड राजा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग काटोल बापू रोहम, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अनिल म्हस्के (भापोसे), उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान संतोष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर विभाग नागपूर पुजा गायकवाड तसेच सर्व पोलीस स्टेशन येथील ठाणेदार यांनी आप आपल्या पोस्टे अंतर्गत नविन फौजदारी कायदयाबाबत कार्यशाळा घेण्यात आली.

नवीन कायद्यावावत माहिती सर्व ग्रामीण व शहरी भागातील नागरीकांना, पत्रकार, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महीला, युवक तसेच चालक-मालक, विविध स्वयंसेवक संघटनांचे महिला व पुरूष पदाधिकारी तसेच विदयार्थी व विदयार्थीनी, पोलीस पाटील मोठ्या प्रमाणात हजर राहुन सदर कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद पोलीस स्टेशन भिवापूरची कार्यवाही

Thu Jul 4 , 2024
भिवापूर :- दिनांक ३०/०६/२०२४ रोजी पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, भिवापूर येथे पाहमी फाटा येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ याने नमुद घटनास्थळी जावुन टिप्पर क्र. एम एच ४०/सी टी २४२४ च्या चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com