अवैधरीत्या विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई

नागपूर :- पोस्टे सावनेर येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत प्रोव्हीशन रेड कामी पेट्रोलींग करीत असता मुखवीरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, एक इसम मोटरसायकलवर अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून स्टाफने श्री ड्रेसेस दुकाना जवळ सावनेर येथे नाकाबंदी केली असता मोपेड हिरो प्लेझर क्र. एम एच-४०/वी.यु-१३०२ चा चालक आरोपी नामे- बबन सुखदेव भोंगा वय ४९ वर्ष रा वार्ड न. १७ पहीलेपार सावनेर त. सावनेर जि. नागपुर याच्या ताब्यात असलेली मोपेड हिरो प्लेड़ार क्र. एम एच-४०/बी.यु-१३०२ किंमती २५०००/- रू. मध्ये रॉयल स्टेजच्या १२ निषा किंमती २१६०/- रु चा मुद्देमाल असा एकूण २७,१६० रू. चा मुद्देमाल घेऊन जाताना मिळून आल्याने आरोपीकडून असा एकुण वाहनासह २७,१६०/-रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम ६५ (अ) म.दा.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे सावनेर येथील ठाणेदार पोनि रविंद्र मानकर, पोउपनि स्वप्नील गेडाम, सफौ सुभाष राठोड, पोहवा संतोष बैरागी, पोशि नितेश परखड पोस्टे सावनेर यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीतांना कोर्टातून शिक्षा

Thu Jul 4 , 2024
नागपूर :-पो.स्टे. काटोल दि. ३०/०९/२०२२ चे १७/२१ वा. दरम्यान फिर्यादी नामे सर तर्फे पोहवा प्रभुदास दलाल यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन काटोल येथे अप. क्र. ७३५/२२ कलम ३०२, ३४ भादंवी कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. दिनांक २९/९/२०२२ चे १६/०० वा. ते दि. ३०/०९/२०२२ चे ०९/५९ वा. दरम्यान यातील फिर्यादी हे पो.स्टे. काटोल येथे तपास पथक अधिकारी म्हणुन कर्तव्यावर हजर असता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com