नागपूर रेल्वे स्थानक हल्दीराम रेस्टॉरंट समोर महिला सेने तर्फे आक्रमक आंदोलन.

नागपुर –  राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष सौ. मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मध्य रेल्वे स्टेशन नागपूर येथील हल्दीराम रेस्टॉरंट समोर आक्रमक आंदोलन करण्यात आले. मनसेचे पदाधिकारी पोहोचण्याच्या आधीच मनसेचा धसका घेऊन त्यांनी इंग्रजी बोर्डवर मराठीचा फलक  लावलेला दिसला. हल्दीराम व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे पाच दिवसात आम्हाला मराठीचा फलक व्यवस्थितरित्या लावून दिसायला पाहिजे अन्यथा आम्ही रेस्टॉरंट चालू देणार नाही तसेच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना सुद्धा निवेदन देऊन संपूर्ण नागपूर शहरांमध्ये जे व्यापारी आहेत रेस्टोरेंट, मॉल, शाळा, दवाखाने, खाजगी कार्यालय आणि सरकारी कार्यालय यांना मराठी फलक लावावा व दैनंदिन व्यवहार मराठी भाषेत च करावा यासाठी निवेदन दिलं त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं व्यापारी संघटनाची एक बैठक बोलावून पोलीस विभागातर्फे त्यांना लवकरात लवकर आदेशाचं पालन करायला लावू आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन नागपुर मधील व्यापारी रेस्टॉरंट खाजगी, कार्यालय शाळा, दवाखाने किंवा मॉल हे जर करत नसतील तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने यांच्या दुकानाच्या काचा फुटल्या जाईल हे आपण लक्षात ठेवावे यानंतर नागपूर मध्ये आम्हाला मराठी फलक दिसला पाहिजे आणि मराठी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. याआधी सुद्धा मेडिकल चौक येथील हल्दीराम यांना निवेदन देण्यात आलेली होती व तिथला फलक मराठी मध्ये लावण्यात आलेला होता तरीसुद्धा हल्दीराम रेस्टॉरंट हा वारंवार चुका करत आहे. यापुढे हल्दीराम रेस्टॉरंट यांनी आपली चूक सुधारून मराठी भाषेचा मानसन्मान करावा.
आंदोलनामध्ये सहभागी शहर उपप्रमुख पूनम चाडगे, दक्षिण विभाग अध्यक्ष मंजुषा ताई पानबुडे, जिल्हाध्यक्ष अचला ताई मेसन, सहसचिव स्वातीताई जयस्वाल, प्रभाग अध्यक्ष दीपा चीरकुटे, मनीषा पराड (जनहित कक्ष) राज बहिर, सागर चाडगे, सोनाली पराड आणि अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तसेच रेल्वे विभागातील सर्व पोलीस अधिकारी, व कर्मचाऱ्यांचा ताफा तेथे उपस्थित होता तसेच नागपुर मधील सर्व मीडिया उपस्थितीत होती. मराठी पाट्या साठी मनसेकडून अनेकदा आंदोलने झाली व भविष्यात सुद्धा मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आक्रमक आंदोलन होणार. मराठीचा अभिमान महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने ठेवायलाच पाहिजे हे स्वाभाविक आहे. व्यापाऱ्यांनी स्थानिक राज भाषेला सुद्धा सहकार्य करावे. महाराष्ट्रात राहतांना व्यवसाय करून स्थानिक भाषेचा अनादर करायचा ? हे आम्ही सहन करणार नाही. असं वक्तव्य महिला शहराध्यक्षा मनीषा पापडकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”

Fri Feb 4 , 2022
नवी दिल्ली, 4 : -‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता.             यावर्षीपासून राजपथावरील पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिंग तुकडीला ऑनलाईन नोंदणीव्दारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पंथसंचलन संपल्यानंतर MyGov या पोर्टलवर ऑनलाईन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com