नागपूर :- मंत्री डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सुचनेनुसार, राज्यात दिनांक 26/09/2022 पासुन 05/10/2022 पर्यंत नवरात्री उत्सवात 18 वर्षावरील महिलांच्या आरोग्य तपासणीबाबतचा “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे अभियान राज्यभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सदर उपक्रम राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानअंतर्गत म.न.पा. नागपूर मध्ये कार्यरत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच म.न.पा दवाखाने येथे दि दिनांक 26/09/2022 पासुन 05/10/2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंघाने म.न.पा. नागपूर मध्ये पाचपावली सुतीकागृह, कमाल टॉकीजच्या मागे, पाचपावली येथे दि. 27/09/2022 रोजी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सदर शिबीराचे उदघाटन मंगळवारी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे.
सदर नवरात्र उपक्रमाची रुपरेखा पुढीलप्रमाणे आहे.
अ) तपासणी रुपरेखा :-
1. स्त्री रोग तज्ञांकडुन गरोदर माता, जननक्षम वयोगटातील 18 वर्षावरील सर्व महिलांची तपासणी
2. 30 वर्षावरील सर्व महिलांचे एन.सी.डी.स्क्रिनिंग (उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, बी.एम.आय. ब्लड शुगर)
3. सर्व वयोगटातील स्त्रीयांचे रक्तगट यांची तपासणी
4. TD चे लसीकरण करणे
5. सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या
6. कॅन्सर स्क्रिनिंग
7. पोषण, स्तनपान, अति जोखमीच्या प्रसुतीकरीता योग्य मार्गदर्शन व समुपदेशन व तपासणी.
8. किशोरवयीन मुलींमधील फॉलिक अॅसिड, जंतनाशक औषधाच्या माध्यमातुन रक्तक्षय प्रतिबंधित करणे, सिकलसेल तपासणी आणि थैलसिमीयाबाबत मार्गदर्शन
9. मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत स्त्रिरोग तंज्ञाकडुन अतिजोखमीच्या गरोदर मातांची तपासणी व सोनोग्रापफी
10. दंत रोग निदान शिबीर, डोळयांची तपासणी
11. क्षयरोग, चेस्ट ए-क्सरे, कुष्ठरोग तपासणी
12. कुटुंब नियोजन कार्यक्रमाअंतर्गत शिबीर
13. गर्भसंस्कार शिबीर
14. मानसिक रोग तपासणी
15. माता-बालक, यांचे कोविड व सर्व प्रकारचे लसीकरण
16. जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांच्या लाभ
17. व्यसनमुक्ती मार्गदर्शन
18. रक्तदान शिबीर.
सदर शिबिराअंतर्गत उपरोक्त तपासणी करण्यात येणार असुन त्यानुसार औषोधपचार व योग्य ते समुदपदेशन तज्ञांमार्फत करण्यात येणार आहे.
करीता नागपूर शहरातील जास्तीत जास्त माता व भगिनींनी पाचपावली सुतीकागृह, कमाल टॉकीजच्या मागे, पाचपावली येथे दि. 27/09/2022 रोजी उपस्थित राहुन सदर शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन म.न.पा. नागपुर, आरोग्य विभागा तर्फे करण्यात येत आहे.