नागपुर :- नागपूर महानगरपालिकेमध्ये गुणवत्ता विकास कार्यक्रमाला चालना देण्यासाठी ‘मिशन नवचेतना’ हा उपक्रम राबविला जात आहेत सुरुवात करण्यात आली. यामध्ये भौतिक सुविधा व विद्यार्थी गुणवत्ता विकास यावर अधिक भर देण्यात आला. शाळामंध्ये नियोजनबद्ध उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकातर्फे आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मित्र व शाळा निरीक्षक यांच्या सहकार्याने शैक्षणिक उपक्रमावर आधारित वार्षिक कॅलेंडर तयार करण्यात आला सोबतच शाळामंध्ये आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षक मित्रांद्वारे दप्तराविना शनिवार उपक्रमाचे नियोजन पुस्तिका तयार करण्यात आले.
शाळामंध्ये उपक्रमांचे योग्य नियोजन करता यावे व विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व शिक्षणाधिकारी तसेच शाळा निरीक्षक आणि शिक्षक मित्र यांच्याद्वारे वार्षिक दिनदर्शिका व दप्तराविना पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. प्रत्येक शनिवार हा मनोरंजनात्मक व आनंद देणारा शनिवार असावा यासाठी राज्य शासनाने सुद्धा पाऊल उचलेले आहे त्याच आधारावर मनपा मध्ये आता प्रत्येक शनिवार हा आनंदायी व मनोरंजात्मक असेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मनपा शाळेमध्ये मोफत सुविधेचे आणि आनंदायिक शिक्षणाचा लाभ घेतील असा संदेश अतिरिक्त आयुक्त यांनी दिला व सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना दप्तराविना शनिवार उत्कृष्टपणे राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
येत्या शनिवारला सर्व शाळांमध्ये उत्स्फूर्तपणे दप्तराविना शनिवार उपक्रम राबविण्यात आला ज्यामध्ये शिक्षक व विद्यार्थी यांनी एकत्रितपणे विविध आनंददायी व मनोरंजनात्मक कृती व खेळ घेतल्या गेले.