नागपुर – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता पासून सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत 90 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण 560 मतदार असून तीन उमेदवार रिंगणात आहेत.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीत सहभाग नोंदवला.
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना हातमोजे देण्यात आले. थर्मल स्कॅनिंगद्वारे तापमान मोजूनच मतदारांना मतदान कक्षात प्रवेश देण्यात आला.
महानगरपालिकेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूच्या तहसील कार्यालयात, तर जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार निवास परिसरातील ग्रामीण तहसिल कार्यालयात मताधिकार बजावला. या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे.