सावनेर :- ४ ऑगष्ट रोजी नागपुर जिल्हा भाजपाचे एकदिवसीय अधिवेशन प्रसंग सेलीब्रेशन हॉल, बस स्टँड च्या मागे, सावनेर, जिल्हा नागपुर येथे आयोजीत करण्यात आले असुन या अधिवेशनाला प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री, देवेन्द्र फडणवीस उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुधाकर कोहळे यांनी पत्रपरिषदेमध्ये दिली.
अधिवेशनाचे कामकाज दुपारी १ वाजे पासुन तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. अधिवेशनाचा प्रारंभ महाराष्ट्र गीताने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात येणार आहे. जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या अध्यक्षतेत होणा-या अधिवेशनाचे उदघाटन प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार असुन समारोप उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. अधिवेशनाच्या कामकाजात पुढील विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
१) कृषी विषयक प्रस्ताव / शेतक-यांना विज माफी – देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात येणार असुन प्रदेश कार्यसमीती सदस्य, डॉ.राजीव पोतदार हा प्रस्ताव मांडणार आहेत.
२) महाराष्ट्र तसेच जिल्हयातील विद्यमान राजकीय स्थिती प्रस्ताव मांडण्यात येणार असुन माजी आमदार, तथा प्रदेश प्रभारी ओबीसी मोर्चा डॉ. आशिष देशमुख हा प्रस्ताव मांडणार आहेत. या शिवाय
३) संघटनात्मक विषयावर विदर्भ विभागीय संघटनमंत्री डॉ. उपेन्द्रजी कोठेकर मार्गदर्शन करणार आहेत
४) जिल्हा परीषदेतील भ्रष्टाचार आंदोलनात्मक भुमीका या विषयावर जिल्हा भाजपा महामंत्री उदयसिंग ऊर्फ गज्जुजी यादव,
५) विवीध शासकीय योजनेत भाजप कार्यकर्त्यांची सक्रीयता या विषयावर माजी जिल्हा भाजपा अध्यक्ष तथा लोकसभा निवडणुक प्रमुख अरविंद गजभिये यांचे मार्गदर्शन होणार आहे. प्रदेश पदाधिकारी व सदस्य, जिल्हा पदाधिकारी व सदस्य, आजी माजी आमदार, खासदार, राष्ट्रीय परीषद व राज्य परीषद सदस्य, आजी माजी जि.प., प.स., न.प. सदस्य, जिल्हा आघाडी, सेल मोर्चा पदाधिकारी व सदस्य, मंडळ पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनीधी सरपंच/उपसरपंच, परीवारातील बँक संचालक / शिक्षण संस्था संचालक, सर्व निमंत्रीत व विशेष निमंत्रीत या सर्वांना रविवारच्या अधिवेशनात निमंत्रीत करण्यात आलेले आहेत.