नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :-दिनांक १६.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०५ कैसेस तसेच, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०२ केस असे एकुण ०७ केसेसमध्ये एकुण ०६ ईसमांवर कारवाई करून १,४७,४००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण ०५ ईसांवर कारवाई करून २७,२१५/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ६,४६७ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २७,२१५/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रीतरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून, यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक

Fri Oct 18 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत प्लॉट नं. १०१, आनंद गृह निर्माण सोसायटी बेसा, बेलतरोडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे किशोर सोमाजी खोब्रागडे, वय ४० वर्षे, यांनी वडीलांचे पेंशन संबंधीत कागदपत्राची पाहणी करण्याकरीता बेडरूम मधील कपाट बघीतले असता, कपाटाचे लॉकर तुटलेले दिसुन आले व कपाटामध्ये ठेवलेले रोख १०,०००/- रु. दिसुन आले नाही. दिनांक १०.१०.२०२४ चे १३.०० वा. चे सुमारास फिर्यादीच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com