नागपूर :- ५ जून हा दिवस संपूर्ण जगात विश्व पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, विश्व पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन रविन्द्रकुमार सिंगल नागपूर शहर पोलीस आयुक्त यांचे हस्ते, आज दिनांक ०५.०६.२०२४ रोजी सकाळी ०७.०० वा. पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथील पथरीगढ़, डी लाईन, अधिकारी निवासस्थान जवळील, इंग्रेजकालीन १०० वर्ष जुन्या विहीरीची साफ-सफाई व पुर्नभरण अभियानाची सुरूवात करण्यात आली.
यानिमीत्ताने संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मा. आयुक्तांनी स्वतः साफ-सफाई करून स्वच्छतेचा संदेश देवुन श्रमदान केले. तसेच याप्रसंगी पर्यावरणपुरक वृक्षारोपण कार्यकम घेण्यात आला, पोलीस आयुक्त यांनी स्वः हस्ते वृक्षारोपण करून सर्वांनी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मोठया संख्यने पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पर्यावरणप्रेमी व सामाजीक संस्थेचे युवा सभासद हजर होते.