नागपूर :-दिनांक १५.११.२०२४ रोजी रविंद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांनी नागपुर शहरातील विधानसभा निवडणुक २०२४ संबंधाने सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कुल, सिव्हील लाईन, सदर येथे भेट दिली. त्यादरम्यान तेथील ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉग रूमची पाहणी केली. तसेच, स्ट्रॉगरूम चे सुरक्षेबाबत उपस्थित सुरक्षा रक्षक तथा मतदान अधिकारी यांना सुरक्षेच्या उपाययोजने बाबत विचारणा करून योग्य त्या सुचना देवुन सुरक्षेबाबत आढावा घेतला. तसेच, नागपुर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विधानसभा निवडणुक संबंधाने वेगवेगळ्या ठिकाणी बंदोवस्त असता, त्यांना सुध्दा मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणुन, आजपासुन सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कुल येथे निवडणुक प्रक्रीया ही बॅलेट पेपर दुवारे घेण्यात येत आहे. त्याबाबत ही मा. पोलीस आयुक्त यांनी आढावा घेवुन बॅलेट पेपर द्वारे मतदान सुरळीत पार पाडण्याबाबत योग्य त्या सुचना देवुन मार्गदर्शन केले.